30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeनांदेडनांदेड मनसेचे जिल्हा प्रमुख प्रकाश कौडगे यांचे निधन

नांदेड मनसेचे जिल्हा प्रमुख प्रकाश कौडगे यांचे निधन

एकमत ऑनलाईन

नांदेड : शिवसेनेत अनेक वर्षे जिल्हा प्रमुख पदांवर काम केलेले काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत दाखल झालेले विद्यमान जिल्हा प्रमुख प्रकाश कौडगे यांचे अल्पशा आजारामुळे हैदराबाद येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना गुरुवारी सकाळी ६ वाजता निधन झाले आहे, ते ५३ वर्षाचे होते.

शिवसेनेचा झुंजार नेता म्हणून ओळख असलेले तत्कालीन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश कौडगे यांनी शिवसेना वाढीसाठी मौलाचे कार्य केले आहे त्याच्या काळामध्ये महापालिकांमध्ये सत्ता शिवसेनेला मिळाली होती व जिल्हा परिषद मध्ये अध्यक्ष पदावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची वर्णी लागली होती. पक्ष वाढीसाठी अहोरात्र मेहनत घेतली अनेक पदांवर शिवसेनेच्या कार्यकर्ते वर्णी लावण्यात प्रकाश कौडगे यांचा सिंहाचा वाटा आहे.

काही राजकीय मदभेदामुळे प्रकाश कौडगे यांनी कांहीं वर्षांपूर्वी मनसेत प्रवेश केला ते विधान जिल्हा प्रमुख होते. त्यांच्या पच्छात पत्नी दोन मुले दोन मुली भाऊ असा मोठा परिवार असलेल्यांची महिती कौडगे यांचे निकटवर्तीय वानखेडे यांनी दिली. नितीन गडकरी, स्व.गोपिनाथराव मुंडे, यांच्या सोबत भाजपमध्ये असताना काम केले आहे.त्यांच्या दु:ख निधनाने जिल्ह्यातील शिवसेना ,महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजप व राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी दु:ख व्यक्त केले आहे.

एका लढवय्या कार्यकर्त्यास गमावलो – पालकमंत्री अशोकराव चव्हाण
प्रकाश कौडगे यांनी नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात नेहमीच सकारात्मक भूमिका वठवली होती. सामान्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणे, हा त्यांचा स्थायी भाव होता. अनेक वर्ष शिवसेनेत त्यांनी काम केले. त्यांचे आणि माझे अत्यंत स्नेहाचे संबंध होते. अलिकडल्या काळात जरी ते इतर पक्षात काम करीत असले तरीही मुळात त्यांचा पिंड शिवसैनिकाचा होता. त्यांच्या निधनाने आपण एका लढवय्या कार्यकर्त्यास गमावलो आहोत, अशी भावना व्यक्त करत पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

सामाजिक प्रश्नांची जाण असणा-या कार्यकर्त्याला मुकलो- माजी खा. खतगावकर
शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख प्रकाश कोडगे यांची कट्टर शिवसैनिक म्हणून नांदेड जिल्ह्यात ओळख होती. नांदेड जिल्ह्यात शिवसेना वाढविण्याचे काम त्यांनी केले, त्यांची एक लढवय्या कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख होती. ते कोणाच्याही वेळाकाळाला गोरगरिबांच्या अडचणीला धावून जात असत. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून सर्वात जास्त कार्यकाळ त्यांनी काम पाहिलेला आहे. ते लिंगायत समाजाचे नेते होते. जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा बसविण्यासाठी त्यांनी लिंगायत समाज एकत्र करून हा लढा यशस्वी केला. आशा सामाजिक प्रश्नाची जाण असणा-या सच्चा कार्यकर्त्यास मुकलो.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील अध्यापक आणि वैद्यकीय अधिका-यांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या