22.2 C
Latur
Sunday, January 17, 2021
Home नांदेड नांदेडला कोरोना प्रतिबंधक लसीचे १७३३० डोस मिळाले

नांदेडला कोरोना प्रतिबंधक लसीचे १७३३० डोस मिळाले

एकमत ऑनलाईन

नांदेड : बहुप्रतिक्षीत कोरोना प्रतिबंधक लसीचे १७ हजार ३३० डोस नांदेड जिल्ह्यास मिळाले आहेत.शनिवार दि.१६ रोजी सकाळपासून जिल्ह्यातील सहा केंद्रावर लसीकरणास सुरूवात होणार आहे.या पहिल्या टप्प्यात वैद्यकीय क्षेत्रातील व पोलिस दलातील नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना लस दिली जाणार आहे,अशी माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. एम. शिंदे यांनी एकमतशी बोलतांना दिली.

कोरोनाच्या संकटामुळे संपुर्ण जग हैराण झाले आहे.या संकटावर औषधी,लसीमुळे कधी एकदा मात करता येईल याची प्रतिक्षा गेल्या अनेक महिन्यापासून होती.अखेर ही लस नांदेड जिल्ह्यास मिळाली आहे.बुधवारी रात्री बाराच्या सुमारास नांदेड जिल्हयास १७ हजार ३३० डोस (वाईल्स) घेऊन आरोग्य विभागाची व्हॅन शहरात दाखल झाली. एका वाईल्समध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दहा डोस असतात. कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे डोस मिळताच ते तापमान संतुलित ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे असलेल्या शितगृहात ठेवण्यात आली आहे,असे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी. एम. शिंदे यांनी एकमतशी बोलतांना सांगीतले.

कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची सुरूवात शनिवार दि.१६ जानेवारीपासून जिल्हयातील सहा लसीकरण केंद्रावर दिली जाणार आहे.यासाठी विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय, श्री गुरु गोविंदसिंघ स्मारक जिल्हा शासकीय रुग्णालय, मुखेड येथील उप जिल्हा रुग्णालय, हदगाव, मुगट आणि नांदेड शहरातील हैदरबाग येथील शासकीय रुग्णालय हे सहा केंद्र राहणार असून या ठिकाणी शासनाच्या संकेत स्थळावर नोंद झालेल्या डॉक्टर, आरोग्य कर्मचारी व पोलिस कर्मचारी यांना कोरोना प्रतिबंधात्मक डोस दिला जाणार आहे. दिवसाला शंभर किंवा त्या पेक्षा जास्त लाभार्थ्यांना देखील ही लस दिली जाणार आहे. उद्या दि. १६ जानेवारीपासून नांदेड जिल्ह्यातील सहा केंद्रावर कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम सुरु होणार आहे. यासाठीची जिल्हा प्रशासन, महापालिका व जिल्हा परिषदेने तयारी पूर्ण केली आहे.

जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी केली पाहणी
नांदेड जिल्ह्यासाठी पहिल्या टप्प्यात बुधवारी रात्री १७ हजार ३३० डोस मिळालेग़ुरूवारी सकाळी जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर,मनपा आयुक्त डॉ.सुनिल लहाने व जि.प.च्या सीईओं वर्षा ठाकुर यांनी या डोसची पाहणी करून माहिती घेतली.यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी. एम. शिंदे,जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.निळकंठ भोसीकर,मनपाचे उपायुक्त अजितपालसिंघ संधु,पर्यवेक्षक देशमुख आदीची उपस्थिती होती.

फायटर अजिंक्य

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,408FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या