नांदेड : कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेतंर्गत नांदेड जिल्ह्यात ३१ जुलै पर्यंत नियम, अटी लागू करुन टाळेबंदी लागू करण्यात आली होती. ही मुदत संपल्याने दि. ३१ ऑगस्ट पर्यंत टाळेबंदीचा हा आदेश पुन्हा जैसे थे लागू असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी काढले आहेत.
राज्य शासनाने दिलेल्या नियम, अटीनुसार कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नांदेड जिल्ह्यात दि. ३१ जुलै पर्यंत टाळेबंदीचा आदेश काढला होता. या आदेशात राज्य शासनाने दिलेल्या शिथीलतेनुसार आठवड्यातील पाच दिवस म्हणजेच सोमवार ते शुक्रवार पर्यंत शहरातील बाजारपेठ, अस्थापना सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली होती. तर इतर नियम, अटी कायम ठेवून शनिवार व रविवार हे दोन दिवस बाजारपेठ पूर्णता बंद ठेवण्याचे बंधन घातले आहे.
या महिनाभराच्या टाळेबंदीची मुदत ३१ जुलै रोजी संपत असल्याने सायंकाळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दि.३१ ऑगस्ट पर्यंत पुढील महिनाभरासाठी टाळेबंदीचे आदेश जैसे थे लागू केले आहेत. जुन्या आदेशाप्रमाणे आस्थापना व दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालु ठेवता येणार आहेत.
Read More जिल्हा रुग्णालयात जाण्यास नागरिकांच्या मनात भीती?