29.8 C
Latur
Saturday, December 3, 2022
Homeनांदेडनांदेडमध्ये पीएफआयचे ३ सदस्य तुरुंगात

नांदेडमध्ये पीएफआयचे ३ सदस्य तुरुंगात

एकमत ऑनलाईन

नांदेड : पाप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) संघटनेच्या ३ सदस्यांना फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १५१(१) च्या प्रतिबंधात्मक कार्यवाहीवर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी. एस. जाधव यांनी ६ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावत त्यांना तुरुंगात पाठवले आहे. दरम्यान, नांदेड जिल्ह्यात असा निर्णय पहिल्यांदाच झाला असल्याची चर्चा होत आहे.

इतवाराचे पोलिस निरीक्षक भगवान धबडगे यांनी आमेर खान अजमद खान (३५) संगणक चालक रा. हैदरबाग नांदेड, अब्दुल नदीम अब्दुल वाहेद (३३) संगणक काम, रा.हमीदिया कॉलनी नांदेड, आतावूर रहेमान शेख अहेमद (३४) रबर स्टॅम्प मेकर मदिनानगर नांदेड या तिघांविरुध्द फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १५१ (१) ची प्रतिबंधात्मक कारवाई केली.

Þ पीएफआय संघटनेवर शासनाने बंदी आणल्यानंतर या तिघांकडून संघटनेचे सदस्य असल्यामुळे दखलपात्र गुन्हा घडू शकतो आणि त्यातून समाजाला नुकसान होवू शकते, असा या कार्यवाहीचा आशय आहे. त्यामुळे न्यायालयाने या तिघांना न्यायालयीन कोठडीत ठेवावे, अशी विनंती इतवारा पोलिसांनी केली. आरोपीचे वकिल सय्यद अरिबोद्दीन यांनी यास विरोध केलाÞ. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने तिघांना सहा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. पीएफआय संघटनेवर बंदी घातल्यानंतर बुधवारी या तिघांना न्यायालयात हजर केले. त्यावेळी पोलिस फौजफाटा लावण्यात आला होता.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या