31.8 C
Latur
Tuesday, May 11, 2021
Homeनांदेडनांदेड समृद्धी महामार्गाला जोडणार !

नांदेड समृद्धी महामार्गाला जोडणार !

एकमत ऑनलाईन

मुंबई,दि.१५ (प्रतिनिधी) नांदेड शहर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाशी जोडण्यास राज्य सरकारने तत्वतः मंजुरी दिली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज ही माहिती दिली. या निर्णयामुळे समृद्धी प्रकल्पावर साडेसहा हजार कोटी रूपयांचा अतिरिक्त खर्च होणार आहे.

गुरुवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत नांदेड शहर समृद्धी महामार्गाशी जोडण्याचा निर्णय घेण्यात आला. समृद्धी महामार्गाला नांदेड शहर जोडले गेले पाहिजे, ही माझी इच्छा होती. त्यासाठी मी सतत प्रयत्नशील होतो. अखेर त्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. या निर्णयान्वये समृद्धी महामार्गावरील जालना टी-पॉइंटपासून नांदेड शहरापर्यंत द्रुतगती महामार्गाचे बांधकाम होणार आहे. या प्रकल्पाने नांदेड जिल्ह्यासह हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांनासुद्धा समृद्धी महामार्गाला थेट आणि वेगवान कनेक्टिव्हिटी मिळेल. या प्रकल्पामुळे नांदेड-मुंबई, नांदेड-औरंगाबाद प्रवासासाठी लागणारा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहे, असे चव्हाण यांनी सांगितले.

जालना ते नांदेड द्रुतगती मार्गाची एकूण लांबी १९४ किमी असून, त्यासाठी अंदाजित खर्च ५ हजार ५०० कोटी रूपये असेल. या द्रुतगती महामार्गाच्या बांधकामासाठी तांत्रिक-अभियांत्रिकी व वित्तीय सुसाध्यतासह सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी बैठकीत मंजुरी देण्यात आली. समृद्धी महामार्ग मुंबईच्या दिशेला जेएनपीटीशी जोडला जाणार असल्याने नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यातील माल आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी कमी वेळेत पोहोचवता येणे शक्य होईल, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले.

 

मायग्रेनमुळे होत आहेत मानसिक रोग

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या