22.5 C
Latur
Friday, July 30, 2021
Homeनांदेडनांदेड पुन्हा हादरले : गोळीबार करून युवकास लुटले

नांदेड पुन्हा हादरले : गोळीबार करून युवकास लुटले

एकमत ऑनलाईन

नांदेड : काही दिवसाची उसंत घेताच नांदेड शहर पुन्हा गोळीबाराने हादरले आहे.बचत गटाची बैठक संपवून आपल्या कार्यालयाकडे जाणा-या एका युवकावर भरदिवसा पिस्तुलीतून गोळीबार करुन त्याच्याकडील ५७ हजाराची जबरीने लुट केल्याची घटना शहरातील मदिनानगर भागात मंगळवार दि. १५ रोजी घडली. या घटनेमुळे नांदेडमध्ये खळबळ उडाली असून पोलिस चक्रावले आहेत.

रोहित गुगले हे क्रेडीट अ‍ॅक्सीस ग्रामीण लि. या कंपनीत केंद्र व्यवस्थापक आहेत. मंगळवारी सकाळी आठ वाजता एका बचगटाच्या मिटिंगसाठी गेले होते. तेथून बचत गटाचे ५७ हजार रुपये घेवून आपल्या दुचाकीने परत जात असतांना मदिनानगर भागात त्यांच्या पाठीमागून दोन जण दुचाकीवर आले.आपले तोंड पुर्णपणे बांधून ठेवलेल्या या दोघांनी रोहित गुगलेच्या दुचाकीसमोर आपली दुचाकी आडवी उभी करुन त्यांच्या दुचाकीची चाबी काढून घेतली. त्याच्या तेथे एका भिंतीवर गावठी पिस्तूलीतून गोळीबार केला आणि रोहितकडील ५७ हजार रुपयांची बॅग बळजबरीने चोरुन नेली आहे.

घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलिस अधिक्षक निलेश मोरे, पोलिस उपअधिक्षक सिध्देश्र्वर भोरे, चंद्रसेन देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, इतवाराचे साहेबराव नरवाडे यांच्यासह अनेक पोलिस अधिकारी आणि पोलिस अंमलदार घटनास्थळी पोहचले. घटनेची माहिती घेवून आसपासच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत आहे.काही दिवसांची उसंत घेऊन भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे नांदेड शहरात पुन्हा हादरले असून पोलिसही चक्रावून गेले आहेत.या गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी पथक रवाना करण्यात आले आहेत.

याप्रकरणी सायंकाळी ४ वाजेपर्यंत कोणताही गुन्हा नोंद झाला नव्हता. एका फह्यायनान्स कंपनीच्या कर्मचा-यांना अडवून दोन गुन्हेगारांनी गोळीबार करुन त्यांच्याकडून ५७ हजार व एक लॅपटॉप असलेली बॅग पळविली.यानंतर ते फ रारा झाले आहेत. पैसे देण्यासाठी नकार दिल्यामुळे हल्लेखोरांनी गोळीबार केला., अशी माहिती पोलिस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांनी दिली.

डेल्टा व्हेरिएंटपासून बचाव अत्यंत आवश्यक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या