24.7 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeनांदेडनंदिकेश्वर सोयाबीन शेतकरी गट

नंदिकेश्वर सोयाबीन शेतकरी गट

एकमत ऑनलाईन

लोहा : रायवाडीनी दशपर्णी अर्क बनवले असुन ते आता सोयाबीन व इतर पिकावर फवारणी करण्यासाठी मदत होणार आहे त्यामुळे बाजारात उपलब्ध असलेल्या आषैधे आणी त्यांच्या होणारा खर्च ची बचत होणार आहे त्यामुळे वेळ आणी पैसा ची बचत होणार आहे.

लोहा तालुक्यातील रायवाडी येथील शेतकऱ्यांनी मिळुन एक सोयाबीन शेतकरी गट तयार करून जवळपास २५सभासद आहेत त्यांची जवळपास ८० एकर जमीन आहे त्यामध्ये सोयाबीन ची लागवड करण्यात आली आहे त्यासाठी फैवारणी करण्यासाठी महागड्या औषधांच्या वापर न करता स्वतः तयार करून त्याच वापर करणार आहेत.

लोहा तालुक्यातील रायवाडी येथील शेतकऱ्यांनी गटाने मिळून दहा प्रकारचा पाळा, सिताफळ ,रुचकी ,धोत्रा ,कडूलिंब पपईचा पाला, करंजी, गुळवेल, एरंडा, गणेरी ,बीर, हिरवी मिरची, लसन ,गोमूत्र, गाईचे शेन इत्यादी यांचे मिश्रण करून सोयाबीन फवारण्यासाठी दशपर्णी अर्क तयार करण्यात आला आहे.

याकामी गटातील शेतकरी शिवाजी पवार, सुनील मोरे ,ज्ञानोबा पवार, शेख समदानी, कोंडीबा पवार, शेख अलमोदिन, यशवंत मोरे ,दत्ता मोरे, रणजीत मोरे , मुसा पठाण ताईबाई कापसे ,गोविंदराव विभुते, विश्वनाथ पांचाळ ,विष्णुकांत पवार ,बाबू शेख ,शिवाजी जाधव, रामदास पाटील, याकुब पठाण ,संतोष कवठेकर ,माधवराव कोठेकर, वैजनाथ पांचाळ यासह शेतकरी नी मिळवून हा गट निर्माण केला आहे.
शेतकरी नव नवीन प्रयोग करीत असल्याने शेतकर्यांनी प्रगती होणार आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या