18.5 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeनांदेडराष्ट्रीय महामार्गाचे काम अर्धवट; वाहनधारकांची कसरत

राष्ट्रीय महामार्गाचे काम अर्धवट; वाहनधारकांची कसरत

एकमत ऑनलाईन

कंधार : नांदेड-उदगीर-बीदर हा राष्ट्रीय महामार्ग क्र.५० चा एकीकडे विकास होत असताना लालवाडी मानसपुरी बहादरपुरा पर्यंत रस्त्याचे काम सुरू झाले नाही या खड्डेमय रस्त्यातून जड वाहतूकदारांना मोठी कसरत करावी लागत आहे तर बहादरपुरा येथील मन्याड नदीवरच्या पुलाची दयनीय अवस्था झाली असून आवा जावी साठी हा पुल धोकादायक ठरत आहे अशा या रहदारीच्या मार्गावर संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहनांची रहदारी असून, कायम वर्दळ असते. वास्तविक पाहता या मार्गावर संबंधित विभागाने दिशादर्शक, धोकादायक, अवघड वळण, पुढे गाव आहे, असे फलक लावणे गरजेचे असताना या दोन्ही मार्गावर कुठेच फलक लावलेले नसल्याने दररोज कुठे ना कुठे अपघात होऊन अनेकजण जखमी झाले आहेत. लालवाडी ते बहादरपुरा या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे.

मन्याड नदीवर बहादरपूरा येथील इसवी सन १९७३ ला बांधलेल्या पुलावरून अविरत सेवा प्रदान करणा-या पुलावरील साईड चे दुतर्फा पाईप तुटलेले आहेत तर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत जड वाहनामुळे नदीवरील पुल कोसळतो की काय अशी भीती वाहनधारकात निर्माण झाली आहे या मार्गावरील वाहतूक कमी न होता वाढतच आहे या अरुंद पुलावर केव्हा मोठा अपघात होईल याची शाश्वती नाही अशा वर्दळीच्या पुलाकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष आहे.

पावसात चिखलामुळे पुलावरील दोन्ही बाजूस रस्ता निसरडा झाला असून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही ते वाहनांकरिता धोकादायक ठरत आहे दुचाकीस्वारांचा जीव येथे धोक्यात आहे यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे मन्याड नदी दुथडी भरून वाहत आहे आणि पुलाला चिटकून पाणी राहत असल्याने पाणी खांबातून शिरत असल्यामुळे पुल कमकुवत होण्याची शक्यता नाकारता येत नाही रस्ता चांगला झाल्याने या मार्गावर जड वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे बहादरपूरा येथील मन्याड नदीवरील पुल धोकादायक असल्याची चर्चा या भागातील नागरिकांकडून व वाहन धारकांकडून होत असताना याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष का आहे? हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. वरिष्ठ अधिकारी यांनी याकडे त्वरित लक्ष देऊन हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी होत आहे आणि या मार्गावर वळण मोठ्या प्रमाणात असल्याने छोटे-मोठे अपघात होत आहे त्याकरिता जागोजागी फलक लावून त्यावर तसा नामोल्लेख करावा, अशी मागणी केली जात आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या