22.6 C
Latur
Monday, January 18, 2021
Home नांदेड पीककर्जासाठी राष्ट्रीय,इतर बँकांचा हात आखडता

पीककर्जासाठी राष्ट्रीय,इतर बँकांचा हात आखडता

एकमत ऑनलाईन

नांदेड : कोरोनाच्या संकटामुळे नांदेड जिल्हयातील २ लाख ६८ हजार शेतक-यांनी ऑनलाइन पद्धतीने बँकांकडे पीककर्जाची मागणी केली होती. मात्र राष्ट्रीयकृत व इतर बँकांची कर्जवाटपासाठी आखडता हात घेतला आहे.यामुळे उपलब्ध आकडेवारीवरून जिल्ह्यात केवळ २५ टक्केच कर्ज वाटप झाल्याचे दिसुन येत आहे. केवळ नांदेड जिल्हामध्यवर्ती बँकेने कर्जवाटपाचे उद्दिष्ट पुर्ण करून शेतक-यांना दिलासा दिला आहे.

कोरोनाच्या संकटामुळे यंदा शासनाकडून शेतक-यांना खरिप हंगामात वेळेवर पीक कर्ज मिळावे यासाठी ऑनलाइन पद्धतीने बँकांकडे पीककर्जाची मागणी करण्याची मुभा दिली होती. शासनाने दिलेल्या मुदतीत नांदेड जिल्हयातील २ लाख ६८ हजार शेतक-यांनी ऑनलाइन पद्धतीने बँकांकडे पीककर्जाची मागणी केली होती.पीक कर्ज वाटपासाठी जिल्हा बँकेला १८५ कोटी ७४ लाख ८२ हजार रुपयांचे उद्दिष्ट असून बँकेने ५५ हजार १७५ शेतक-यांना २६० कोटी ९१ लाख ९८ हजार रुपयांचे कर्ज वाटप केले आहे.

व्यापारी बँकांना १ हजार ५५७ कोटी ६७ लाख ३८ हजार रुपयांचे उद्दिंष्ट असून व्यापारी आणि खाजगी बँकांनी फक्त १३ हजार ८१८ शेतक-यांना १३५ कोटी ९२ लाख ६९ हजार रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. गत आठवडाभरात ७ हजार २९६ शेतक-्यांना १०५ कोटी ५१ लाख ३६ हजार रुपये एवढे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. तर, महाराष्ट्र ग्रामीण बँकेला २८८ कोटी २५ लाख ५० हजार रुपयांचे उद्दिष्ट असून बँकेने फक्त १८ हजार ५७० शेतक-यांना ११९ कोटी ३४ लाख ४ हजार रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. केवळ जिल्हा बँक सोडता इतर बँकांचा कर्ज वाटपासाठी आखडता हात घेतल्याचे दिसून येत आहे. अजूनही ऑनलाइन मागणी अर्ज केलेल्यांपैकी १ लाख ८० हजार ४३७ शेतकरी कर्ज मिळण्याची प्रतिक्षा करित आहेत.उपलब्ध झालेल्या या आकडेवारीवरून जिल्हयात केवळ २५ टक्के कर्ज वाटप झाल्याचे दिसून येत आहे.

शेतक-यांकडे पीक कजार्साठी अनावश्यक कागदपत्रांची मागणी करू नये, या जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आदेशास बँकांकडून दुर्लक्षित केले जात आहे. कर्जासाठी बँकांमध्ये हेलपाटे मारावे लागत असल्याने शेतकरी त्रस्त झाल आहेत.या बाबीची जिल्हाधिका-यांनी दखल घ्यावी अशी मागणी होत आहे.

१ सप्टेंबरपासून मेट्रोची सेवा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा विचार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,409FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या