ईस्लापूर : ईस्लापूर येथे राष्ट्रसंत श्री सेवालाल महाराज यांची २८४ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली असुन सावरगाव येथील महिलांनी या कार्यक्रमा प्रसंगी पारंपारिक वेशभूषेत नृत्य सादर केले आहे.
तर या जयंती कार्यक्रमास मोठ्या प्रमाणावर समाज बांधवांची उपस्थिती लाभली होती.
बंजारा समाजाचे आराध्य दैवत राष्ट्रसंत श्री सेवालाल महाराज यांच्या २८४ व्या जयंतीचा कार्यक्रम ईस्लापूर येथील राष्ट्रसंत श्री सेवालाल महाराज चौकात दि. १६ फेब्रुवारी गुरुवार रोजी आयोजीत करण्यात आला होता. प्रथमता येथील चौकात डिजिटल फलकाचे अनावरण माजी सरपंच देविदास पळसपुरे यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर भोगपूजा कार्यक्रम संपन्न करून राष्ट्रसंत श्री सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी डॉ.गितकुमार पवार,डाँ भगवान गंगासागर, तुकाराम बोनगीर,काँ अर्जुन आडे, प्रभाकर बोडेवाड, रवी कसबे,अनिरुध्द राठोड यांनी राष्ट्रसंत श्री सेवालाल महाराज यांच्या जीवन चरित्रावर सखोल मत व्यक्त केले.
या कार्यक्रमास बालाजी आलेवार, नारायण शिनगारे, बालाजी दुरपडे, काशिनाथ शिंदे, जेष्ठ पत्रकार गंगाराम गडमवाड, सरपंच संदीप पानपते, माजी सरपंच रामराव जाधव, ग्रा.प.सदस्य चंद्रकांत पाकलवाड प्रशांत डांगे, गजानन कदम, निर्गुण कदम, बाळासाहेब शेरे ,अवधूत सोळंके,अनिल आडे,शिवा आडे,देविदास राठोड,सुनिल आडे, विजय जाधव,बाळु गिरी यांची उपस्थिती लाभली होती.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनोज राठोड,शिवराम जाधव, ईश्वर जाधव, कृष्णा राठोड, इंद्रसिंग आडे, साईनाथ जाधव, प्रमोद राठोड, सुदाम जाधव,लव जाधव, गजु जाधव, संजय टेलर,निरंजन राठोड परोटी यानी परिश्रम घेतले.
या जयंती सोहळा कार्यक्रमास ईस्लापूर, जलधरा शिवणी, आप्पारावपेठ परिसरातील समाज बांधव यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभली होती. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार पत्रकार ईशवर जाधव यांनी मानले. तर जय सेवालाल नावाच्या घोषणेने इस्लापूर नगरी दुमदुमली होती.