22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeनांदेडचोरीच्या वाळूकडे पोलीस आणि महसूल विभागाचे दुर्लक्ष

चोरीच्या वाळूकडे पोलीस आणि महसूल विभागाचे दुर्लक्ष

एकमत ऑनलाईन

नरसीफाटा : मुदखेड व लोहा महसूल प्रशासनाच्या आशीवार्दाने अनेक गावात गोदावरी नदीतु न तरफ्याने उपसलेली वाळू शासकीय भावापेक्षा अध्यार्हून कमी दराने दररोज रात्रभर नायगाव शहर व तालुक्यात विक्री होत असल्याने नायगाव तालुक्यातील रितसर लिलाव घेतलेले ठेकेदार अडचणीत आले आहेत. पोलीस व महसूलच्या वरिष्ठ अधिका-्यांना हे सांगूनही काही उपयोग होत नसल्यानेची भावना नायगाव तालुक्यातील काही वाळू ठेकेदारांनी व्यक्त केली.त्यामुळे याकडे जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.

गेल्या दोन तीन महीण्यायापासून लोहा तालुक्यातील येळी ,महाटी ,कौडगाव ,व मुदखेड तालुक्यातील काही गावातील रेती माफीयांनी राजकीय पाठबळावर गोदावरी नदी मध्ये मजुर लावुन तरफ्याच्या साह्याने मोठ्या प्रमाणात रात्र दिवस वाळू उत्खनन करून टिप्पर च्या साह्याने रात्रभर नायगाव शहर व तालुक्यात व काहाळा गडगा मार्ग मुखेड तालुक्यात बे भाव वाळू विक्री करत आहेत या अवैध वाळू विक्रीला कुंटूर व नायगांव ,रामतिर्थ पोलसांसह काही महसूलचे कर्मचारी पाठबळ देत असल्याचे यावरून दिसुन येत आहे .लोहा तालुक्यातील अवैध रेती उत्खननातुन रेती माफीया गब्बर होत आहेत याकडे जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर हे का लक्ष देत नाहीत यांचा प्रश्र अनेकाला पडला आहे.

नायगाव तालुक्यात साठ्याची जप्त वाळू मोठ्या प्रमाणावर आहे सदरील वाळू लिलावत घेऊन इतर खर्चासह ती जाग्यावर सात हजार रुपये ब्रास पडते ती वाळू वाहतूक खर्च व नफा लावला तर नायगावत नऊ हजार रुपये अधिकृत पावतीची वाळू विक्री होते. मात्र मुदखेड व लोहा तालुक्यातील गोदावरी पत्रातून तरफ्याने उपसलेली शासनाचा महसूल बुडवून विना पावती चोरीने आणलेली सदरची वाळू नायगाव तालुक्यात सहा हजार रुपये ब्रास घरापोच दिली जात आहे नायगाव तालुक्यात चोरीची वाळू घेऊन येणारे वाहन मालक वजीरगाव फाटा, कहाळा, पर्यंत वाहन आणताना पथकात कोण कोण आहेत याचा शोध काही तलाठ्यानं कडून घेतात आणि कधी टोल नाक्यावरून तर कधी काहळा सोमठाणा वरून गंगणबीड कडे तर कधी कहाळ्या वरून कोलंबी लालवंडी मार्गे नायगावात तर काही याच वाळूची वाहने संबंधित तलाठ्याच्या संपर्कात राहून कहाळा गडगा मार्गे मुखेड कडे नियमित जात असल्याचे याच वाळू व्यवसायातील काही मंडळी सांगतात मात्र महसूल केवल पथकाच्या भरोशावर नावात आहे. तर नायगाव आणि कुंटूर पोलीस मात्र आपला स्वार्थ साधून वाळू विषय आमचा नाही हे सहज बोलून जातात.

चोरीच्या वाळूला महसूल आणि पोलीस बळ देत असतील तर आम्ही कशाला शासनाचा लाखो करोडो रुपयांचा महसूल भराव, महसूल भरूनही आम्हाला वाहतूक करताना पोलीस आणि महसूल कर्मचा-यांचा त्रास होतो. बाहेरील तालुक्यातून येणा-्या चोरीच्या वाळूला लगाम लावल्या शिवाय तालुक्यातील साठ्याची वाळू विक्री होणार नाही अशी भावना नायगाव तालुक्यातील वाळू व्यावसायिकातून व्यक्त होत आहे विशेष म्हणजे नायगाव येथे प्रशिनार्थी आलेले उपविभागीय अधिकारी महेश जमदाडे हे सुरूवातीला आल्यावर कर्तव्य दक्ष वाटले पण सध्या ते या कडे दुर्लक्ष करीत आहेत त्यामुळे त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर अनेकांनी नाराजी व्यक्त करत आहेत .पोलीस आणि महसूल अधिकारी ठरवले तर लोहा तालुक्यातील रेती नायगाव तालुक्यात येणे बंद होईल पण हे केव्हा होणार अशी चर्चा सर्वसामान्यातुन होत आहे

येलकी सशस्त्र सीमा बलात ११० जवान कोरोना बाधीत

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या