23.2 C
Latur
Wednesday, June 16, 2021
Homeनांदेडसीमावर्ती भागात दूरसंचार विभागाचे दुर्लक्ष

सीमावर्ती भागात दूरसंचार विभागाचे दुर्लक्ष

एकमत ऑनलाईन

बिलोली : नांदेड जिल्ह्यातील सीमावर्ती भागात दूरसंचार विभागाने पूर्णत: दुर्लक्ष केल्याचे चित्र दिसून येत आहे याबाबत खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी लक्ष घालणार असल्याचे सांगण्यात आले दरम्यान सीमावर्ती भागातील जनतेने या बाबत दूरसंचार विभागाच्या अडचणी विषयी कळूनही अध्याप ठोस कारवाई झाली नसल्याचे सांगण्यात येते.

राज्याच्या सीमावर्ती भागात दूरसंचार विभागाने आपल्या बी एस एन एल सेवेविषयी पूर्णत: दुर्लक्ष केले आहे त्यामुळे कित्येक दिवस पूर्णत: बीएसएनएल मोबाईल सेवा बंद ठेवण्यात धन्यता मानली आहे. केबलचे दूरस्थीचे कारण देऊन वरिष्ठ अधिकारी कित्येक महिने बिनधास्त राहत असल्याचे चित्र दिसून आले बी एस एन एल सेवे विषयी लक्ष देण्यास वरिष्ठ अधिकारी का कानाडोळा करत असावेत? याचे कोडे अद्याप उलगडलेले नाही.बीएसएनएल ही सेवा सर्वसामान्य यापेक्षा सार्वजनिक आणि शासकीय यंत्रणा अधिक वापरत असते. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला बीएसएनएलच्या भोंगळ कारभारामुळे शासकीय निमशासकीय आणि आर्थिक क्षेत्रातून काम करून घेणे कठीण झाले आहे.

याबाबत विद्यमान खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्याकडे सीमावर्ती भागातील समन्वयकांनी ग्राहकाचे अडचण व्यक्त केली. त्यांनी या प्रकरणी लक्ष घालणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र दूरसंचार विभागाच्या अधिका-्यांनी अध्याप ठोस पाऊल उचलल्याचे दिसून येत नाही. बँक, पोलीस स्टेशन ,तहसील, रजिस्ट्री कार्यालय या व अन्य यंत्रणांना बीएसएनएल या सेवेवर अवलंबून राहावे लागत असल्याचे सांगण्यात आले. शासकीय यंत्रणा कार्यरत असूनही बीएसएनएल सेवेच्या ढिसाळ कारभारामुळे सर्वत्र नाराजी पसरत पसरत आहे.आता खासदार प्रताप राव पाटील यांच्या भुमिकेकडे अनेकांचे लक्ष लागुन आहे.

आधारकार्डशिवायही लसीकरण शक्य

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या