32.3 C
Latur
Sunday, April 11, 2021
Homeनांदेडनांदेड जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा नवा उच्चांक; १४५0 बाधीत

नांदेड जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा नवा उच्चांक; १४५0 बाधीत

एकमत ऑनलाईन

नांदेड : जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या ५ हजार २६३ अहवालापैकी १ हजार ४५० अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे ६८६ तर अँटिजेन तपासणीद्वारे ७६४ अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या ५२ हजार ३४२ एवढी झाली असून यातील ४० हजार ११८ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला १० हजार ९७९ रुग्ण उपचार घेत असून १८९ बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

दिनांक ४ ते ७ एप्रिल या चार दिवसांच्या कालावधीत २६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या ९९६ एवढी झाली आहे. आज रोजी १ हजार २२७ बाधितांना औषधोपचारानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी ६, मनपा अंतर्गत एन.आर.आय. भवन व गृह विलगीकरण ८२२, कंधार तालुक्याअंतर्गत ६, किनवट कोविड रुग्णालय १९, हिमायतनगर तालुक्याअंतर्गत ३, अर्धापुर तालुक्याअंतर्गत २३, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल २०, उमरी तालुक्यातंर्गत ३४, नायगाव तालुक्याअंतर्गत ११, मुखेड कोविड रुग्णालय ४५, देगलूर तालुक्याअंतर्गत ३०, खाजगी रुग्णालय ११४, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय ४, हदगाव कोविड रुग्णालय १९, माहूर तालुक्याअंतर्गत ८, बिलोली तालुक्याअंतर्गत ३२, लोहा तालुक्याअंतर्गत ३१ असे एकूण १ हजार २२७ बाधितांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७६.६४ टक्के आहे.

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात २८९, बिलोली ६, हिमायतनगर ४५, मुदखेड ८, परभणी ४, नांदेड ग्रामीण ३१, देगलूर ४३, कंधार १, मुखेड ५०, यवतमाळ २, अर्धापुर १६, धर्माबाद १६, किनवट १७, नायगाव ३९, हिंगोली ७, भोकर १०, हदगाव ५१, लोहा २६, उमरी २४, बिदर १ असे एकूण ६८६ बाधित आढळले.आजच्या बाधितांमध्ये अ‍ॅन्टिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र ३२३, नांदेड ग्रामीण २८, अर्धापुर २९, भोकर २८, बिलोली ३१, देगूलर १९, धर्माबाद ११, हदगाव १८, हिमायतनगर ३, कंधार ११, किनवट ८३ , लोहा ४२, माहूर १५, मुदखेड २७, मुखेड १२, नायगाव ३७, उमरी ३४, परभणी ८, यवतमाळ ९, हिंगाली २, औरंगाबाद १, पुणे १ असे एकूण ७६४ व्यक्ती अँन्टिजेन तपासणीद्वारे बाधित आले आहेत.

जिल्ह्यात १० हजार ९७९ बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे २४४, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड ११२, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) १९९, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड १४६, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर १२३, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर २०९, देगलूर कोविड रुग्णालय ५६, जैनब हॉस्पिटल कोविड केअर सेंटर ८२, बिलोली कोविड केअर सेंटर २७७, हिमायतनगर कोविड केअर सेंटर १४, नायगाव कोविड केअर सेंटर १३९, उमरी कोविड केअर सेंटर ४४, माहूर कोविड केअर सेंटर २१, भोकर कोविड केअर सेंटर २५, हदगाव कोविड रुग्णालय ३२, हदगाव कोविड केअर सेंटर ६९, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर १०३, कंधार कोविड केअर सेंटर १४, धमार्बाद कोविड केअर सेंटर ८०, मुदखेड कोविड केअर सेंटर ११, अर्धापुर कोविड केअर सेंटर ४७, बारड कोविड केअर सेंटर ४०, मांडवी कोविड केअर सेंटर ७, महसूल कोविड केअर सेंटर ११२, एनआरआय कोविड केअर सेंटर १४०, पंजाब भवन कोविड केअर सेंटर १५२, नांदेड मनपाअंतर्गत गृहविलगीकरण ४ हजार ४२३, नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण २ हजार ५०६, खाजगी रुग्णालय १ हजार ५५२ असे एकूण १० हजार ९७९ रुग्ण उपचार घेत आहेत.

आज रोजी सांयकाळी ५ वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे १०, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे ७, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे ६ खाटा उपलब्ध आहेत.

मंगळस्वा-यांना गती

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,473FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या