34.3 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeनांदेडनांदेड जिल्ह्यात नवा उच्चांक ; २७ बाधीतांचा मृत्यू तर ११८६ नव्या कोरोना...

नांदेड जिल्ह्यात नवा उच्चांक ; २७ बाधीतांचा मृत्यू तर ११८६ नव्या कोरोना बाधितांची नोंद

एकमत ऑनलाईन

नांदेड : रविवारी कोरोनाच्या दुस-या लाटेत सर्वाधिक रुग्णांच्या मृत्यूचा आकडा पार केला आहे. दिवस अखेर नव्या ११८६ रुग्णांची नोंद झाली आहे. शहरासह नायगाव, लोहा, किनवट सुद्धा आता आघाडीवर आले आहेत. उपचार घेणा-या रुग्णांची संख्या १०८९१ एवढी झाली आहे. तर खाजगी रुग्णालयात उपचार घेणारे रुग्ण १२१७ आहेत तर एकाच दिवशी २७ रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

जिल्हा कोवीड रुग्णालय नांदेड येथे शिवाजीनगर नांदेड पुरुष वय ६३,सन्मित्र कॉलोनी नांदेड पुरुष ५१,तरोडा (खु) पुरुष ७५, अर्धापुर महिला ७२,जयभीमनगर नांदेड महिला ६०, वसंतनगर महिला ६०, सांगवी महिला ६०,फरांदेनगर नांदेड पुरुष ५५, नवी आबादी पुरुष ४८, बांधकामनगर महिला ५५, हिंगोली नाका नांदेड पुरुष ५८,ं उमरी रुग्णालय येथे रवीनगर उमरी महिला ८२, देगलूर रुग्णालय येथे इब्राहिमपूर देगलूर पुरुष ५६,मुखेड रुग्णालय येथे मुखेड पुरुष ९४, कुंटूर ता.नायगाव पुरुष ४९, कंधार रुग्णालय येथे स्मशान भूमी कंधार महिला ६५, खाजगी रुग्णालयांमध्ये रुई ता.कंधार पुरुष ८५, रवीनगर तरोडा पुरुष ७९,सरकारी रुग्णालय विष्णुपुरी येथे कनकेवाडी ता.हदगाव महिला ६४,कहाळा ता.नायगाव पुरुष ७०,देगलूर नाका नांदेड पुरुष ४५, बसवेश्वरनगर महिला ३८, लोहा महिला ७५, सिडको नांदेड महिला ६७, धनेगाव नांदेड महीला ५६,लोहा महिला ६०,चिखलवाडी नांदेड पुरुष ७२ असे आज एकूण २७ मृत्यू कोरोना बाधेने दिले आहेत. त्यामुळे आजपर्यंत कोरोना बाधेने मरण पावणा-या रुग्णांची संख्या ८९६ झाली आहे.

मनपा अंतर्गत विलगीकरण -६४७, आयुर्वेदिक महाविद्यालय -१०, जिल्हा रुग्णालय कोवीड हॉस्पिटल नांदेड -२८, अर्धापुर -१४, उमरी-२७, खाजगी रुग्णालय १०७, किनवट -५९, बिलोली -१०, शासकीय रूग्णालय विष्णुपूरी-०२, मुखेड -३१, हदगाव-२७, नायगाव-०३, धर्माबाद-११,कंधार-०८, अशा एकूण ९९३ रुग्णांना उपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे आजपर्यंत उपचार घेवून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३५६४२ झाली आहे. उपचाराने चांगले झालेल्या रुग्णांचे प्रमाण ७४.७६ टक्के आहे.

आज प्राप्त झालेल्या ३८४४ अहवालांमधील २५५८ अहवाल निगेटीव्ह आहेत, ११८६ अहवाल पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे आज एकूण रुग्ण संख्या ४७६६९ एवढी झाली आहे. आज प्राप्त झालेल्या आरटीपीसीआर तपासणीमध्ये ५१२ आणि अँटीजेन तपासणीमध्ये ६७४ असे एकूण ११८६ रुग्ण आहेत.आजच्या ११८६ रुग्णांमध्ये सर्वाधिक नांदेड मनपा क्षेत्रात ५५२ रुग्ण आहेत. आज ३८१ स्वॅब तपासणी अहवाल प्रलंबित आहेत. आज नाकारण्यात आलेले स्वॅब ६० आहेत. आज अनिर्णीत राहिलेले स्वॅब २९ आहेत.

आजच्या आरटीपीसीआर तपासणीमध्ये मनपा क्षेत्रात -२४२, लोहा -४५, नांदेड ग्रामीण -१४, नायगाव -२४, कंधार-२७, हिमायतनगर-१९, अर्धापुर-१२, हदगाव-०१, माहूर-०३, भोकर-१७, मुखेड-२९, देगलूर-१५,धर्माबाद-१३,उमरी-३७, परभणी-०३, यवतमाळ-०२, असे ५१२ रुग्ण आहेत. आज प्राप्त झालेल्या अ‍ॅन्टीजेन तपासणीमध्ये नांदेड मनपा क्षेत्र -३१०, किनवट-६८, नायगाव -३४, नांदेड ग्रामीण-३०, बिलोली-१३, देगलूर-०४, धमार्बाद -२७, लोहा-१९, उमरी -०८, भोकर-२१, अर्धापुर -३०, मुखेड-२८, मुदखेड -४३, परभणी-०४,कंधार-१२,हदगाव-२१,माहूर-०१,आदिलाबाद-०१, असे ६७४ रुग्ण आहेत.

आज कोरोनाचे १०८९१ अ‍ॅक्टीव्ह रुग्ण ज्यांच्यावर शासकीय रुग्णालय विष्णुपूरी -२४१, जिल्हा रुग्णालय-१०६, जिल्हा रुग्णालय नवीन इमारत-१८८,नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगिकरण -५१८९, देगलूर -५०, नांदेड जिल्ह्यातील तालुकाअंतर्गत गृह विलगिकरण -१७५७, किनवट-१३६, हदगाव-१०१, महसूल कोविड-१५७, मुखेड-२८०, लोहा-११२, कंधार-३४, आयुर्वेदिक महाविद्यालय-१३४, खाजगी रुग्णालय-१२१७, बिलोली-२२७, नायगाव-९९, उमरी-३२, माहूर-२१, भोकर-२३, हिमायतनगर-१३, धर्माबाद-३३, मुदखेड-५२, अर्धापुर-११, बारड-१२, मांडवी-०६, जैनम कोवीड सेंटर देगलूर-११३, एनआयआर कोविड केअर सेंटर-२७५, पंजाब भवन कोविड केअर सेंटर- २७२, असे उपचार सुरू आहेत. यात अती गंभीर स्वरुपात १६५ रुग्ण आहेत. आजच्या स्थितीत रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी -१०, जिल्हा रुग्णालय कोविड केअर हॉस्पीटल १०, आयुर्वेदिक महाविद्यालय-०८ आहेत.

लातुरात ६० टक्के रुग्ण गृह विलगीकरणात

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या