28.2 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeनांदेडनांदेडात एनआयएची छापेमारी ३ संशयित ताब्यात

नांदेडात एनआयएची छापेमारी ३ संशयित ताब्यात

एकमत ऑनलाईन

नांदेड : राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने दहशतवादी संघटना इसिस मॉड्यूल प्रकरणात राज्यभरात छापेमारी करीत १३ संशयितांच्या घरांची झाडाझडती घेतली. यामध्ये नांदेड जिल्ह्याचा समावेश असून रविवारी सकाळी शहरातील तीन संशयितांना या तपास यंत्रणेने ताब्यात घेतले होते. सध्या या तिघांची एटीएसच्या कार्यालयात कसून चौकशी करण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे.

जगभरातील मोठी दहशतवादी संघटना म्हणून इसिस ओळखली जाते. आतापर्यंत अनेक हल्ले इसिसने घडवून आणले आहेत. या घटनांचा राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएकडून तपास करण्यात येत आहे. रविवारी सकाळी नांदेड जिल्ह्यातही एनआयएने कारवाई केली आहे. देशातील दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून शहरातील इतवारा ठाण्याच्या हद्दीत पैलवान टी हाऊसलगत असलेल्या वस्तीमधील तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. कुराणविषयी उर्दूमधून लिखाण केलेला मजकूर हिंदीमध्ये प्रसारित करून पुन्हा पाठविण्यात आल्याचे चॅटिंगमध्ये निष्पन्न झाले आहे.

दहशतवादी संघटनेशी संबंधित व्यक्तीकडे मोबाईलवरून चॅटिंग केल्याचा संशय राष्ट्रीय तपास यंत्रणेला आल्यानंतर या तीन संशयितांना ताब्यात घेऊन दहशतवाद विरोधी पथकाच्या कार्यालयात कसून चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणी दहशतवादविरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी असे सांगितले की, या तीन जणांची सध्या चौकशी करण्यात येत आहे.

सध्या त्यांच्याकडून आक्षेपार्ह असे काही मिळाले नसले तरीही पुढील चौकशीमध्ये आणखी काही बाबी स्पष्ट होतील अशी शक्यता व्यक्त केली. दरम्यान याबाबत स्थानिक पोलिस प्रशासनातील वरिष्ठ अधिका-यांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. परंतू या कारवाई बाबत कोणतीही माहिती नसल्याने सांगण्यात आले. एनआयएच्या कारवाईबाबत अंत्यत गोपनीयता पाळण्यात येत आहे. या कारवाईमुळे नांदेड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या