36.2 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeनांदेडनांदेड जिल्ह्यात साडेनऊ लाख अर्जदारांनी भरला पिकविमा

नांदेड जिल्ह्यात साडेनऊ लाख अर्जदारांनी भरला पिकविमा

एकमत ऑनलाईन

लोहा : प्रधानमंत्री पिक विमा योजनेत नांदेड जिल्ह्यात खरीप हंगाम २०२० साठी ९ लाख ५२ हजार ७२२ अर्जदार शेतक-यांनी ऑनलाईन पद्धतीने पिकविमा भरला. यातून पाच हजार ३० हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केले आहे. यापोटी विमा संरक्षित रक्कम दोन हजार ९८ कोटी रुपये आहे. सध्या वैयक्तिक दावे केलेल्यांना विमा परतावा मिळत आहे. परंतु इतर अर्जदारांना मात्र खरीप पिकांची उत्पादकता तसेच अंतिम पैसेवारी जाहीर झाल्यानंतर विम्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

नांदेड जिल्ह्यात दरवर्षी लाखो शेतकरी प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागी होतात. यावर्षी खरीप हंगाम २०२०-२१ मध्ये खरीप पिकासाठी शेतक-यांनी ऑनलाइन पद्धतीने पिक विमा भरला आहे. यात उडीद, कापूस, मूग, तूर, खरीप ज्वारी व सोयाबीन या पिकासाठी शेतक-यांनी नऊ लाख ५२ हजार ७२२ अर्ज दाखल केले आहेत. यात शेतक-यांनी विमा हप्त्यापोटी ४४ कोटी ४५ लाख रुपये कंपनीकडे भरले आहे. यातून पाच हजार ३० हेक्‍टर क्षेत्र विमा संरक्षित केले आहे. तर दोन हजार ९८ कोटी रुपये विमा संरक्षित रक्कम आहे.

जिल्ह्यात यंदा सप्टेंबरमध्ये झालेली अतिवृष्टी तसेच ऑक्टोबरमधील परतीच्या पावसामुळे खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे शेतक-यांना पीक विमा मिळेल अशी आशा आहे. दरम्यान सप्टेंबर – ऑक्टोबर मधील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांनी वैयक्तिक दावे दाखल करावी असे आवाहन विमा कंपनीने तसेच प्रशासनाने केले होते. त्यानुसार ज्या शेतक-्यांनी अर्ज दाखल केले आहेत. अशा ६३ हजार शेतक-यांना ६४ कोटी रुपयांचा परतावा आजपर्यंत मिळाला आहे. अजूनही जिल्ह्यातील शेकडो शेतकरी परताव्यापासून वंचित आहेत. तर ज्या शेतक-यांनी वैयक्तिक दावा दाखल केला नाही अशा शेतक-यांनाही विमा मिळावा अशी मागणी शेतक-यांसह शेतकरी संघटनांसह केली जात आहे. दरम्यान शासनाने जिल्ह्यात सरसकट पीक विमा जाहीर करावा, अशी मागणी शेतक-यांमधून होत आहे.

गूढ रोगाचे आंध्र प्रदेशात थैमान; ३४० जण रुग्णालयात दाखल

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या