36.2 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeनांदेडजनतेतून निवडलेल्या महीला सरपंचावर अविश्वास ठराव

जनतेतून निवडलेल्या महीला सरपंचावर अविश्वास ठराव

एकमत ऑनलाईन

माहूर : तालुक्यातील अतिदुर्गम भागात वसलेल्या पाचुंदा या गावच्या जनतेतून निवडून आलेल्या महीला सरपंच सौ.शेवंताबाई तुकाराम खुडे यांचेवर दि.१८ नोव्हें.रोजी अविश्वास प्रस्ताव पारित झाला आहे. अध्यासी अधिकारी तथा तहसीलदार सिद्धेश्वर वरणगांवकर यांचे अध्यक्षतेखाली घेतलेल्या ग्रामसभेत ५९९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजवला. प्रस्तावाच्या बाजूने ३०१, विरोधात २५८ तर ४०मते अवैध ठरलीत.

सरपंच पदाचा अडीच वषार्चा कार्यकाळ संपल्यानंतर सरपंच पती तुकाराम खुडे यांचे उर्मट वागणे, प्रत्येक बाबतीत नाहक हस्तक्षेप करणे, विकास कामात अन्य सदस्याना विश्वासात न घेणे, जमा-खचार्चा हिशेब न देणे व मनमानी कारभार करणे आदि बाबींना कंटाळल्यामुळे दि.३१ ऑगस्ट २०२० रोजी या अविश्वास प्रस्तावाच्या तयारीला सुरुवात झाली. ४ सप्टें.रोजी सर्वप्रथम ७ सदस्य असलेल्या ग्रामपंचायत मध्ये अविश्वास प्रस्तावावर मतदान घेण्यात आले. त्यात प्रस्तावाच्या बाजूने ४ तर विरोधात ३ मते पडलीत. परंतु सदर महीला सरपंच थेट जनतेतून निवडून आल्या असल्या कारणाने ग्रामसभा घेण्यात आली. तीत गुप्त मतदान पद्धतीने अविश्वास प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

पीठासीन अधिकारी वरणगांवकर यांना निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार व्यंकटेश गोविंदवार, पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी आरबडवार यांनी सहकार्य केले. तर कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून तालुका आरोग्य अधिकारी डॉ.साहेबराव भिसे यांनी योग्यती खबरदारी घेतली. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून माहूर पोलिस स्टेशनचे पो.नि. लक्ष्मण राख यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. सदर मतदानाची मोजणी प्रक्रिया १८नोव्हें. च्या रात्री ८ वाजता पार पडली. निवडणूक प्रक्रिया पार पडण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक, मंडळ अधिकारी तहसिल कार्यालयाचे कर्मचारी प्रकाश शेडमाके, प्रभु पानोळे यांनी कर्तव्य बजावले.

थेट जनतेतून निवडून आलेल्या तेही महीला सरपंचावर अविश्वास प्रस्ताव पारित करण्याची मराठवाड्यातील ही पाहिली घटना असल्याची प्रतिक्रिया तहसीलदार सिद्धेश्वर वरणगांवकर यांनी दिली. जनतेतुन निवडूण दिलेल्या सरपंचाची विश्वासार्था महत्वाची असून सरपंचांनी जनतेचा विश्वास ठेवुन कामे केली पाहीजेत मात्र तसे होत नाही. जनतेने विश्वास ठेवुन निवडूण दिलेल्या उमेदवाराने गावातील अनेक विकासकामे त्याबरोबर जनहितार्थ कार्य , वेगवेगळ्या मोहीम राबवुन कामे करणे गरजेचे असते. मात्र तसे न होता काही लोभापोटी जनतेचा विश्वास गमावला जातो. ही खेदाची बाब आहे. राज्यात जनतेतुन सरपंच पद निवडूण देण्याची योजना सुरू असून याचा फायदा विश्वासू सरपंचाला होणार आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या