34.4 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeनांदेडमुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी मिळेना

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी मिळेना

एकमत ऑनलाईन

निवघाबाजार : हदगांव तालुक्यातील अनेक खेडे गावांना पक्का रस्ता नव्हता. त्यामुळे तालुक्यासह निवघा -तळणी सर्कल मधिल अनेक गावांच्या नागरीकांना खराब रस्त्यामुळे अनेक संकटाचा सामना करावा लागत असे, आरोग्य सेवा ,शेतीमाल, तसेच ग्रामीण भागातील विद्याथ्यार्ना शाळेसाठी ये जा करण्यासाठी पक्के २स्ते नसल्याने अनेक गावांना वाहन जात नसे या खेडेगावांना जाण्यासाठी वाहणधारकांना तारेवरची कसरत करावी लागत असे सर्कल मधिल अनेक खेड्यांना स्वातंत्र काळापासुन आजपर्यत एस.टी. पोहचली नाही.

गावांना शहरी भागांना जोडण्यासाठी शासनाकडून काही वषार्पुर्वी पंतप्रधान ग्रामीण सडक योजना राबविण्यात आली त्यामध्ये तालुक्यातील रस्ता नसलेल्या अनेक खेडयांना याचा लाभ मीळाला नाही.केंद्र शासनाचा निधी असल्याने खासदार मोहदयांनी रस्ता मागणी केलेल्या गावानाच निधी मीळत असे, अनेक गाव खेडे पक्क्या रस्त्यापासुन वंचीत राहील्याने महाराष्ट्र शासनाकडून मुख्यमंत्री सडक योजना राबवण्यात आली त्यामध्ये शासनाकडून या रस्त्यासाठी करोडो रुपये निधी देण्यात आला निवघा सर्कल मधिल अनेक खेड्यांना मुख्यमंत्री सडक योजने मार्फत मोठा निधी मिळून पक्के रस्ते तयार झाले आहेत.

त्यामध्ये मनुला (बु),वरूला, काळेश्वर,रुई,व सध्या चालू असलेले माटाळा ह्या गावांना मुख्यमंत्री सडक योजने मार्फत रस्ते चांगले व्हावे व जास्त काळ टिकावे यासाठी करोडो रुपये निधी देण्यात आला काही गावांच्या रस्त्याचे कामही पुर्ण होवून दोन ते तिन वर्ष झाले पुर्ण झालेल्या काम कमीत कमी पाच वर्ष तरी टिकावे यासाठी या पुर्ण झालेल्या कामांच्या देखभाल दुरुस्तीसाठी लाखो रुपयांची रक्कम ठेवण्यात आली होती. निवघा – तळणी सर्कल मधिल मुख्यमंत्री सडक योजनेतून झालेल्या अनेक रस्त्याचे काम नित्कृष्ठ दजार्चे झाल्याने दोन ते तिन वर्षातच रस्ते खराब होवून खड्डे पडले असून काही रस्त्याने तर चालने मुस्कील झाले आहे याला जबाबदार सबंधित ठेकेदार व अधिकारी असल्याचे बोलल्या जात आहे. यामध्ये निवघा सर्कल मधिल शिरड ते मनुला हा रस्ता ह्या योजने अंतर्गत करण्यात आला १ कोटी ८७ लाख ६२ हजार रुपये निधी खर्च करून रस्ता पुर्ण झाला ठेकेदारांची मनमानी व अधिका-्यांच्या दुर्लक्षामुळे दोन वर्षातच शिरड येथे रस्ता उखडला असून रस्त्यावर साईड नाल्यांचे पाणी येत असल्याने रस्त्याने पायी चालने मुस्कील झाले आहे.

या रस्त्याचे काम पुर्ण झाले तेव्हांपासून ते पाच वर्ष देखभाल दुरुस्ती साठी शासनाकडून १२लाख ४९ हजारांची रक्कम ठेवण्यात आली असून सुद्धा दोन वर्षातच रस्ता उखडून व अधिका-यांना वारंवार सुचना करुनही रस्ता दुरुस्ती होत नाही. याबाबत वर्तमान पत्राततही बातम्या प्रकाशीत करण्यात आल्या तरी याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे.

याबाबत मुख्यमंत्री सडक योजनेचे मुख्य अभियंता सुधीर पाटील यांच्याशी भ्रमणध्वनी वरुन विचारणा केली असता हा रस्ता उखडल्याचे त्यांनी मान्य केले व देखभाल दुरुस्ती साठी शासनाकडून निधीच मिळत नसल्याने हे रस्ते दुरुस्ती रखडली असून, सध्या मुख्यमंत्री सडक योजनेचे चालू असलेले माटाळा रस्त्याचे काम हे ठेकेदार स्वत:हा पैसे टाकून पुर्ण करीत असल्याचे त्यांनी यावेळी दै.एकमतशी बोलतांना सांगितले. रस्ते दुरुस्ती लवकर व्हावी अशी मागणी येथील नागरी कामधून होत आहे.

चिखलीकर पिता -पुत्राचे निवडणुकीसाठी अर्ज दाखल

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या