23.8 C
Latur
Friday, September 24, 2021
Homeनांदेडनांदेड जिल्ह्यात एकही नवीन कोरोना रुग्ण साडला नाही

नांदेड जिल्ह्यात एकही नवीन कोरोना रुग्ण साडला नाही

एकमत ऑनलाईन

नांदेड : गेल्या महिनाभरापासून कोरोनाच्या नव्या रूग्ण संख्येत मोठी घट झाली आहे.सोमवारी तर गौरी सणाचा सण आनंदाचा ठरला आहे.आरोग्य विभागास प्राप्त झालेल्या अहवालात जिल्हयात एकही नवीन कोरोना रुग्ण तपासणीत सापडला नाही. यामुळे जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या ९० हजार २८२ एवढयावर स्थिर आहे. यात ८७ हजार ६०० रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

नांदेड जिल्हयात कोरोनाने सध्या दिलासा दिला आहेग़ेल्या महिन्याभरापासून तर नव्या रूग्ण संख्येंत मोठी घट झाली आहेक़ोरोना तपासणीचे प्रमाणही कमी झाल्यामुळे केवळ दहाच्या आतच आकडयाचा खेळ चालत आहे.सोमवारच्या ६४९ तपासणीत रुग्ण सापडला नाही.एनआयआर भवन आणि गृह विलगीकरण २ रुग्णांना उपचारा नंतर सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे आजपर्यंत उपचार घेवून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ८७६०० झाली आहे. उपचाराने चांगले झालेल्या रुग्णांचे प्रमाण ९७.०२ टक्के आहे.

आज ६४९ अहवालांमध्ये ६३८ निगेटिव्ह आणि ०० पॉझीटीव्ह आहेत.त्यामुळे एकूण रुग्ण संख्या ९०२८२ झाली आहे. आज स्वॅब तपासणी ०० अहवाल प्रलंबित आहेत. आज नाकारण्यात आलेले स्वॅब १० आहेत. आज अनिर्णीत राहिलेले स्वॅब १ आहेत. आज कोरोनाचे ३१ अ‍ॅक्टीव्ह रुग्ण ज्यांच्यावर नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगिकरण १२, नांदेड जिल्ह्यातील तालुकाअंतर्गत गृह विलगिकरण ६, सरकारी रुग्णालय विष्णुपुरी ९,खाजगी रुग्णालय- ४,असे उपचार सुरू आहेत यात अती गंभीर स्वरुपात ४ रुग्ण आहेत. अनेक दिवसानंतर कोरोनाचा एकही नवा बाधित रूग्ण न आढळल्याने गौरीचा सण आनंदी ठरला आहे.

जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या ९० हजार २८२ एवढी आहे. यात ८७ हजार ६०० रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आजच्या घडीला ३१ रुग्ण उपचार घेत असून ४ बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या