22.5 C
Latur
Wednesday, December 8, 2021
Homeनांदेडलस नाही तर दाखला अन् राशन नाही

लस नाही तर दाखला अन् राशन नाही

एकमत ऑनलाईन

निवघा बाजार : हदगाव तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायत पैकी निवघा ग्राम पंचायतीला ओळखले जाते. लोकसंख्या अधिक असल्याने या ग्रामपंचायतीकडे सर्वच राजकीय मंडळीचे विशेष लक्ष असते. तर सदर ग्रातपंचायत ही नेहमीच नाविण्यपुर्ण उपक्रमासाठी ओळखल्या जाते. तर आताही ग्रामपंचायतीने कोविड लसीकरणा संदर्भात घेतलेल्या अनोख्या उपक्रमाची परीसरात चर्चा होताना दिसत आहे.

निवघा बाजार ग्रा.पं.ची लोकसंख्या १० हजार पाचशे असून येथील मतदार ५ हजार आठशे आहे. मतदार लोकसंखेच्या आकडेवारी नुसार येथील २ हजार सातशे पन्नास नागरीकांच्या वर येथील ग्रामस्थाचे एक अथवा दोन डोस पुर्ण झाले असून, लवकरच शंभर टक्के गावातील ग्रामस्थांचे लसीकरण पुर्ण करणार असल्याचा संकल्पच ग्रा.पं.च्या पदाधीका-यांनी केला आहे. त्याप्रमाणे एकही डोस न घेणा-या नागरीकांना कोणताच ग्रामपंचायतचा दाखला मिळणार नसुन ग्रामपंचायतला शासनाकडून आलेल्या आदेशाचे तंतोतंत पालन करुन रॉशन दुकानदारांनी लसीचा एकही डोस न घेतलेल्या नागरीकांना राशन देऊ नये अशा सुचनेची नोटीस ग्रा.पं. कडून बजावण्यात आली आहे.

त्यामुळे कोणत्याच ग्रा.पं.सदस्यला व गावातील लोकप्रतिनीधीला यामध्ये सुट देण्यात आली नसल्याने गावात लसीकरणासाठी नागरीकांची गर्दी होतांना दिसत आहे. आता लसीचेडोस कमी येत आहेत तर नागरिकांची संख्या लसीकरणासाठी वाढत आहे.दि. २१ रोजी १०० लसीचे डोस आले होते. लस घेणा-यांची संख्या वाढली असल्याने दुपारीच लसीचे डोस संपले दुपारनंतर आरोग्य विभागाकडून २०० डोस निवघा येथे आनले असून नागरीक शेतीकामानिमीत्य शेतात जात असल्याने सायंकाळी ५ वाजेपर्यंत लसीकरण सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहीती ग्रा.पं. कडून मिळाली आहे.या लसीकरण ठीकानी ग्रा.पं. येथे उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांनी भेट देऊन शाळेतील शिक्षकांना १०० नागरीकांचे लसीकरण करुन घेण्याचे उद्धिष्ट दिले आहे.

कै.शंकरराव पाटील ग्रामविकास पॅनल प्रमुख तथा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मधुकर पाटील कदम यांच्या मार्गदर्शखाली व उपसरपंच शामसुंदर पाटील कदम यांच्या शिस्तबद् नियोजनामुळे व त्यांना सहकार्य करत असलेले ग्राम पंचायतचे सर्व सदस्य यांच्यामुळे लवकरच निवघा बाजार येथील नागरीकांचे शंभर टक्के लसीकरण पुर्ण होणार असल्याची चर्चा येथील ग्रामस्थामधून होताना दिसत आहे.

याबाबत अध्यक्ष मधुकर पाटील यांना विचारणा केली असता दिवाळीपुर्वीच सर्व नागरीकांचे एक डोस चे तरी लसीकरण पुर्ण करून निवघा बा.येथे लावण्यात आलेले रॉशन व दाखला न देण्याचे नियम शितील करूत नागरीकांनी आम्हाला साथ देऊन आपला दिवाळीपुर्वी एक डोस पुर्ण करावा असे अवहान त्यांनी येथील नागरीकांना केले आहे.दिवाळीपुर्वीच सर्व अठरावर्षावरील ग्रामस्थांचा एक डोस पुर्ण करण्याचे उदिष्ट आम्ही ठेवले असून त्यानूसार ग्राम पंचायत चे नियोजन लावण्यात आले असून, ग्राम पंचायत सदस्य,व शाळेतील शिक्षकांना सोबत घेवून लवकरच सर्व ग्रामस्थांचे लसीकरण पुर्ण करणार. ग्रा.पं.उपसरपंच शामसुंदर पाटील निवघा बाजार.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या