तीन महिन्यापासून प्रकरण प्रलंबित, एकमतच्या वृत्ताची दखल,
नांदेड: किनवट तालुक्यातील चिखली (ई) येथील अंगणवाडी सेविकेने लहान बालके व गरोदर मातांना वाटप करण्यासाठी आलेला पोषण आहार दि.१० ऑक्टोबर २०२२ रोजी अफरातफरी करत काळ्या बाजारात नेत असतांना गावक-यांनी पाठलाग करून शिवणी येथे मुदेमालासह पकडले होते.
या प्रकरणी सदर अंगणवाडी सेविकेवर गुन्हा दाखल झाला होताÞ या प्रकरणी एकमत मधुन वृत्त प्रकाशीत करून घटणेचा पाठपुरवठा केला होता वृत्ताची दखल घेवुन तालुका एकात्मिक महिला व बालविकास प्रकल्प कार्यालयाकडून ९१ दिवसाच्या चौकशी नंतर दि. ३० जानेवारी रोजी सदरील अंगणवाडी सेविकेस कायमस्वरूपी सेवेतून बडतर्फ करण्यात आले. आहे या कारवाईमुळे किनवट तालुक्यातील अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षकांचे धाबे दणाणले आहेत.
किनवट तालुक्यातील तेलंगणा सीमेवरील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणा-्या शिवणी परिसरतील चिखली ई येथील अंगणवाडी सेविकेने दि.१० ऑक्टोबर २०२२ रोजी भर दुपारी टेम्पो मध्ये पोषण आहार टाकून काळ्या बाजारात घेऊन जात असतांना येथील काही नागरिकांनी मुद्दे माल सह टेम्पो शिवणी येथील बसस्टँड येथे पकडले होते.
या अनुषंगाने सदरील अंगणवाडी सेविकेवर तालुका एकात्मिक महिला व बाल विकास प्रकल्प कार्यालयाकडून घटना स्थळी पंचनामा व चित्रफिती काढण्यात आले होते.त्या नंतर विविध विभागातल्या चार अधिका-यांची समिती नेमून चौकशी करण्यात आली होती. या नंतर संबधित अंगणवाडी सेविकेस आपले म्हणणे मांडण्यासाठी काही काळावधीसुद्धा देण्यात आली होती. या प्रक्रियेतिल चौकशीत सदरील अंगणवाडी सेविका दोषी आढळून आल्याने एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प अधिकरी किनवट यांच्या वतीने जिल्हा प्रकल्प अधिकारी यांना सदरील प्रकरणाचे अहवाल पाठविण्यात आले होते.
या नंतर दि. १६ डिसेंबर २०२२ रोजी शासन निर्णय दिनांक १२ एप्रिल २००७ मधील तरतुदीनुसार कारवाई करण्याचे आदेश किनवट तालुका एकात्मिक महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी यांना दिले होते.या अनुषंगाने किनवट तालुका महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी दि ३० जानेवारी २०२३ रोजच्या पत्राच्या आदेशद्वारे संबधित अंगणवाडी सेविकेस अखेर ९१ दिवसाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सेवेतून कायमस्वरूपी बडतर्फ करण्यात आले.
या कायमस्वरूपी बडतर्फ कारवाईमुळे किनवट तालुक्यातील अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षकांचे धाबे दणाणले.