34.3 C
Latur
Tuesday, April 20, 2021
Homeनांदेडअल्पवयीन मुलीसोबत अश्लील चॅटींग ; शिक्षकाविरुध्द गुन्हा

अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चॅटींग ; शिक्षकाविरुध्द गुन्हा

एकमत ऑनलाईन

नरसीफाटा : शाळतील अल्पवयीन मुलीशी व्हाट्सएपच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे चॉटीग करणे व शाळेत आल्यानंतर जवळीक साधून लगट करण्याचा प्रयत्न करणा-या देगाव येथील पुज्य साने गुरुजी विद्यालयातील शिक्षकाविरुध्द विनयभंग करणे यासह अँट्रासिटी आणि पोस्को या कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपीस पोलीसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती बिलोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सिद्धेश्र्वर धुमाळ यांनी दिली आहे.

नायगाव तालुक्यातील देगाव येथे पुज्य साने गुरुजी विद्यालय असून या विद्यालयातील बापुराव मोरे या सहशिक्षकाने नवव्या वर्गात शिकणा-्या मुलीशी रात्री बे रात्री मोबाईलवर अश्लील चँटींग करत होता आणि मुलगी शाळेत आल्यानंतर तिच्याशी जवळीकता साधून लगट करण्याचा मागील काही दिवसापासून प्रयत्न करत होता.

ही बाब घरच्या मंडळींना मुलीने सांगितल्यानंतर मंगळवारी सकाळी ती मुलगी व तिचे नातेवाईक शाळेत येवून मोरे यांनी करत असलेल्या चाळ्याबद्दल जाब विचारण्यात आला. त्यावेळी वादावादी होवून प्रकरण हात घाईवर आले होते. सदरील शिक्षकाने उध्दटपणाची भाषा वापरल्यामुळे मुलीच्या नातेवाईकांनी त्या शिक्षकास धक्काबुक्की करुन कुंटूर पोलीसांना हा प्रकार सांगितला. यावेळी शाळेत मोठा जमाव जमला होता.

घटनेचे गांभीर्य ओळखून सहायक पोलीस निरीक्षक करीम पठाण यांनी तातडीने देगाव येथे धाव घेतली व सर्व प्रकार ऐकल्यानंतर त्या शिक्षकास ताब्यात घेतले . मंगळवारी सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान सदर प्रकरणी कुंटूर पोलीस ठाण्यात देगाव येथील पुज्य साने गुरुजी विद्यालयातील शिक्षक बापुराव मोरे याच्या विरुद्ध विनयभंग करणे यासह अँट्रासिटी आणि पोस्को या कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपीस पोलीसांच्या ताब्यात असुन पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.धुमाळ हे करीत आहेत.

पक्षाने आमदारकी दिली; नेटाने काम कर – चित्रा वाघ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या