19 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeनांदेडअतिक्रमण हटावच्या कामात अडथळा, गुन्हा दाखल

अतिक्रमण हटावच्या कामात अडथळा, गुन्हा दाखल

एकमत ऑनलाईन

नांदेड : महानगरपालिकेच्या वतिने शहरात विविध भागातील अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात येत आहे़ या कारवाईत अडथळा आणून कर्मचा-यांना दमदाटी करणा-या दोघांविरोधात इतवारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

सध्या शहरात रस्त्यावर करण्यात आलेले अतिक्रमण हटवून रस्ते मोकळे करण्याचे काम सुरू आहे़या कारवाई दरमरूान दि़ ३१ ऑगस्ट रोजी हबीब टॉकीज येथील अन्ननया रेडिमेड कापड दुकानासमोर व दि़ १० सप्टेंबर रोजी देगलूर नाका येथील लोखंडी कुलाच्या चौरस्त्यावरील अतिक्रमण हटावच्या शासकीय कारवाईत दोघांनी अडथळा आणला़ तसेच अतिक्रमण नियंत्रकाच्याविरुद्ध हप्ते वसूल करीत असल्याबाबत लेखी तक्रार देऊन महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचा-यांची बदनामी केली, अशी तक्रार अतिक्रमण विभागाचे नियंत्रक गणेश शिंगे यांनी इतवारा ठाण्यात दिली़ यावरून जफर अली खान पठाण व अन्य एक व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या