22.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeनांदेडविनापरवाना पिस्टल बाळगल्याप्रकरणी गुन्हा

विनापरवाना पिस्टल बाळगल्याप्रकरणी गुन्हा

एकमत ऑनलाईन

नांदेड : जिल्ह्यात गुन्हेगारीचा आलेख वाढला असून, अवैध शस्त्र बाळगणा-याविरूद्ध पोलिसांनी कारवाईचे सत्र सुरू केले आहे. कंधार तालुक्यातील दिग्रस बुÞ येथील तिघांविरूद्ध एअर पिस्टल व एक नकली बंदुक बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कंधार तालुक्यात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कंधार तालुक्यातील दिग्रस बुÞ येथे तीन आरोपींनी विना परवाना एअर पिस्टल व नकली बंदुक स्वत:जवळ बाळगून त्याच्यासोबतचे फोटा सोशल मीडियावर व्हायरल केले. त्यामुळे समाजात दहशत निर्माण झाल्याचा ठपका ठेवून कंधार पोलिसांनी या तिघांविरूद्ध अवैध हत्यार बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या