Wednesday, September 27, 2023

शुक्रवारी ३९ रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह

नांदेड : जिल्ह्यात आज २४ जुलै रोजी सायं. ५ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार ३९ व्यक्तींचे अहवाल बाधित आले. आज ४३ व्यक्ती बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आजच्या एकूण ४५८ अहवालापैकी ३९१ अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता १ हजार १६९ एवढी झाली असून यातील ६५३ एवढे बाधित बरे झाले आहेत. ४५१ बाधितांवर औषधोपचार सुरु असून त्यातील १० बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. यात ४ महिला व ६ पुरुषांचा समावेश आहे. गुरुवार २३ जुलै रोजी गोवर्धन घाट रोड नांदेड येथील ६७ वर्षीय पुरुषाचा शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित मृत्त व्यक्तींची संख्या ५४ एवढी झाली आहे.

आज बरे झालेल्या ४३ बाधितांमध्ये डॉ. शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी येथील ३, धमार्बाद कोविड केअर सेंटर येथील ३, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील १०, बिलोली कोविड केअर सेंटर येथील १, गोकुंदा कोविड केअर सेंटर येथील २, मुखेड कोविड केअर सेंटर येथील १८, देगलूर कोविड केअर सेंटर येथील ४ व खाजगी रुग्णालयातील २ बाधितांचा यात समावेश आहे. आतापर्यंत एकुण ६५३ बाधित व्यक्तींना बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली आहे.

आरटीपीसीआर तपसणीद्वारे ३२ व्यक्तींमध्ये नांदेड आनंदनगर येथील ४८ व ५९ वषार्चे २ पुरुष, शक्तीनगर नांदेड येथील ६५ वषार्चा १ पुरुष, पांडुरंग नांदेड येथील ३६ वषार्ची १ महिला, एमजीएम कॉलेज रोड नांदेड येथील ४३ वषार्चा १ पुरुष, सिडको नांदेड येथील ४४ वषार्चा १ पुरुष, विसावानगर नांदेड येथील २१ वषार्चा १ पुरुष, राहुल कॉलनी तरोडा बु नांदेड येथील ६७ वषार्चा १ पुरुष, दिलीप सिंघ कॉलनी गोवर्धन घाट रोड नांदेड येथील ६७ वषार्चा १ पुरुष, वजिराबाद नांदेड येथील ४० वषार्चा १ पुरुष व ४८ वषार्ची १ महिला, हडको नांदेड येथील ६३ वषार्चा १ पुरुष व ६० वषार्ची १ महिला, ग्रा. रु. भोकर येथील ३६ वषार्चा १ पुरुष, भोकर तालुक्यातील रिठा ५७ वषार्चा १ पुरुष, देगलूर तालुक्यातील मरखेल येथील ४ वषार्ची १ बालिका, देगलूर तालुक्यातील शारदानगर येथील ४७ वषार्चा १ पुरुष, मुखेड तालुक्यातील खैरका २७ वषार्ची १ महिला, मुक्रमाबाद येथील १२ व २५ वषार्चे २ पुरुष, मुखेड शिवाजीनगर ३० वषार्चा २ पुरुष, ६० वषार्चे २ महिला, मुदखेड तालुक्यातील धनज येथील २५ वषार्चा १ पुरुष, धमार्बाद बालाजी गल्ली येथील ७८ वषार्चे १ पुरुष, धमार्बाद येथील ५२ वषार्चा १ पुरुष, कंधार नवीन मारोती मंदिर येथील ३७ वषार्ची १ महिला, परभणी जिल्ह्यातील चौंडी येथील ६५ वषार्चा १ पुरुष, गंगाखेड येथील ६० वषार्चा १ पुरुष, ५३ वषार्ची १ महिला, लातूर जिल्ह्यातील अहमदपूर बसस्थानक येथील ७६ वषार्चा १ पुरुष, हिंगोली तालुक्याती विनायकनगर येथील ६० वषार्ची एका महिलेचा समावेश आहे.

अँटिजेन टेस्ट किट तपासणीद्वारे सुंदरनगर नांदेड येथील ५३ वषार्चा १ पुरुष, भाग्यनगर नांदेड येथील ४९ वषार्चा १ पुरुष, पद्मजा सिटी नांदेड येथील ६३ वषार्चा १ पुरुष, नांदेड गणेशनगर येथील ४२ वषार्चा १ पुरुष, नांदेड गोकुळधाम समोर भावसार चौक येथील ४९ वषार्चा १ पुरुष, बिलोली तालुक्यातील खतगाव येथील ४० वषार्चा १ पुरुष, हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील ५६ वषार्चा एका पुरुषाचा यात समावेश आहे.

जिल्ह्यात ४५१ बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. त्यांना डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे ९७, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे १९१, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे २४, नायगाव कोविड केअर सेंटर येथे १२, बिलोली कोविड केअर सेंटर येथे ३, मुखेड कोविड केअर सेंटर येथे २४, देगलूर कोविड केअर सेंटर येथे १६, उमरी कोविड केअर सेंटर ९, गोकुंदा कोविड केअर सेंटर येथे १, लोहा कोविड केअर सेंटर येथे १३, हदगाव कोविड केअर सेंटर २, भोकर कोविड केअर सेंटर येथे १, कंधार कोविड केअर सेंटर येथे ११, खाजगी रुग्णालयात ४०, बाधित व्यक्ती उपचार घेत असून ५ बाधित औरंगाबाद येथे, निजामाबाद येथे १ बाधित तर मुंबई येथे १ बाधित संदर्भित झाले आहेत.

आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे अ‍ॅप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

Read More  अकलुज येथे वाहतूक जोमात; संचारबंदी कोमात

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या