36.5 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeनांदेडनांदेड जिल्ह्यात नवे सव्वाशे कोरोना रूग्ण : एकाचा मृत्यू

नांदेड जिल्ह्यात नवे सव्वाशे कोरोना रूग्ण : एकाचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

नांदेड : कोरोना अहवालानुसार १२५ व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे ६० तर अ‍ॅटिजेन किट्स तपासणीद्वारे ६५ बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या ८१ कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आजच्या १ हजार ७९९ अहवालापैकी १ हजार ६५८ अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता २४ हजार ३१ एवढी झाली असून यातील २२ हजार ५१६ बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण ६९८ बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील १८ बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.

बुधवार ३ मार्च २०२१ रोजी किनवट तालुक्यातील अप्पारावपेठ येथील ६५ वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आजपर्यंत कोविड-१९ मुळे जिल्ह्यातील ६०३ व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत. आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी ४, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण ५८, मुखेड कोविड रुग्णालय २, किनवट कोविड रुग्णालय ३, देगलूर कोविड रुग्णालय २, खाजगी रुग्णालय १२ असे एकूण ८१ बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण ९३.६९ टक्के आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र ४५, लोहा तालुक्यात ७, हिंगोली ३, नांदेड ग्रामीण ३, माहूर १, यवतमाळ १ असे एकुण ६० बाधित आढळले. अँटीजन किट्स तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र ३६, भोकर तालुक्यात १, धमार्बाद ४, माहूर २, किनवट १, उमरी १, नागपूर १, नांदेड ग्रामीण ३, देगलूर ६, लोहा ३, मुखेड ४, हिंगोली २, यवतमाळ १ असे एकूण ६ बाधित आढळले.

जिल्ह्यात ६९८ बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे ३९, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड ६२, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) २९, किनवट कोविड रुग्णालयात १९, मुखेड कोविड रुग्णालय ५, हदगाव कोविड रुग्णालय ६, महसूल कोविड केअर सेंटर ५२, देगलूर कोविड रुग्णालय ६, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण १७४, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण १०९, खाजगी रुग्णालय ९७ आहेत.

गुरुवार ४ मार्च २०२१ रोजी ५ वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे १४६, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे १५ एवढी आहे. जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती. एकुण घेतलेले स्वॅब- २ लाख ३५ हजार ४७० एकुण निगेटिव्ह स्वॅब- २ लाख ७ हजार १२३ एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- २४ हजार ३१ एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- २२ हजार ५१६ एकुण मृत्यू संख्या-६०३ उपचारानंतर बाधित रुग्ण घरी (गृहविलगीकरण) बरे होण्याचे प्रमाण ९३.६९ टक्के स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-६ स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-६ प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-२०१ रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-९६८ रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-१८ जणांची आहे.

उत्तर सोलापूर तालुक्यातील २३ गावांचे होणार ड्रोनद्वारे भूमापन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
168FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या