18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeनांदेडनांदेड तालुक्यात नदीकाठावरील गावांचे शंभर टक्के नुकसान

नांदेड तालुक्यात नदीकाठावरील गावांचे शंभर टक्के नुकसान

एकमत ऑनलाईन

नांदेड : तालुक्यातील नदीकाठावरील गावांचे अतिवृष्टीमुळे जवळपास शंभर टक्के नुकसान झाले असून पुनर्वसित गावाचे प्रश्न अद्यापही शासन दरबारी प्रलंबित आहेत अतिवृष्टी दरम्यान जवळपास आठ ते दहा दिवस काही गावांचा संपर्क तुटला होता अनेक सखल भागात पाणी शिरले घरांची पडझड झाली शेती पिकांचे मोठे. नुकसान झाले आहे शेतकरी शासनाकडून अद्याप कोणतीही आर्थिक मदत मिळाली नाही असंही खंत पत्रकाराच्या शिष्टमंडाळा समोर मांडली आहे.
अतिवृष्टी दरम्यान झालेल्या नुकसानीचे अनेक भागात पंचनामे झाले नेते कार्यकृर्त्यांनी गावामध्ये भेटी दिल्या पाहणी केली मात्र अद्यापही शेतक-यांना प्रत्यक्षात मदत मिळाली नाही.

पाहणी करणे आश्वासन देने याव्यतिरिक्त शेतक-्यांना दिलासा मिळाला नाही अतिवृष्टीमुळे अनेक घरांची पडझड झाली आहे नदीकाठच्या काही गावांचा अतिवृष्टी दरम्यान जवळपास आठ ते दहा दिवस संपर्क तुटला होता गावात नाली सारखे पाणी वाहत होते नागरिकांनी यांचा सामना जीवावर बेतुण गेला मात्र प्रशासनाकडून केवळ आश्वासने मिळत होती प्रत्यक्षात जाऊन शासनाने मदत केली नाही असंही खंत गावक-यांनी व्यक केली आहे. पुनर्वसित गावाचे प्रश्न अद्यापही शासन दरबारी प्रलंबित आहेत गावात जाणा-या रस्त्यावर नाल्यावरील पूल कमी उंचीचा असल्यामुळे पाऊस झाला की लगेच या पुलावरून पाणी वाहत आहे त्यामुळे गावात जाणारा रस्ता बंद होत आहे पुलाची उंची वाढवावी किंवा पयार्यी रस्ता देण्यची माणणी होत आहे.

नांदेड तालुक्याच्या दक्षिण व उत्तर भागातील नदी काठावरील गावे राहेगाव, गगाबेट, मार्कंड, बेटसागवि , पिंपळगाव कोरका, नागापूर, वाजेगांव, बोढार हवेली, वांगी, गाडेगांव, वडगांव, पिंपळगाव मीश्री, ब्राम्हणवाडा, सिद्धनाथ, पुणेगांव, कामठा, राहेगाव यासह अनेक गावातील शेती पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाली आहे. शासनाकडून फक्त घोषणा केली आहे मात्र शेतक-यांना प्रत्यक्षात मदत देण्यासाठी मोठा विलंब लावल्या जात आहे त्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले असून शासनाने त्वरित मदत देण्याची गरज आहे. गोदावरी काठावर असलेल्या राहेगाव येथे नाल्यावरील पुलाची उंची कमी असल्यामुळे या गावाचा अतिवृष्टी दरम्यान आठ दिवस संपर्क तुटला होता अनेक नेत्यांनी जाऊन पाहणी केली पंचनामे करण्यात आले मात्र शासनाकडून अद्यापही मदत मिळाली नसल्याची खंत गावक-यांनी पत्रकारांसमोर मांडली आहे.

राहेगाव हे नदीकाठावर असून गावाचे पुनर्वसन होणे गरजेचे आहे या गावास पुराच्या पाण्याचा धोका आहे अनेक वेळा गावात पाणी शिरून घरांची पडझड होऊन शेती पिकाचे मोठे नुकसान होत आहे. पुनर्वसित गावांचा प्रश्न शासन दरबारी अद्याप प्रलंबित असून केवळ आश्वासने दिले जातात रस्त्याचा प्रलंबित असून पुलावरील उंची वाढून नवीन पूल बांधण्यात यावा किंवा पर्यय रस्ता मिळावा अशी मागणी गावक-ाांनी केली आहे. ब्राह्मणवाडा या गावात अतिवृष्टीमुळे अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरले घरांची पडझड झाली प्रशासनाने पंचनामे केले मात्र अद्यापही नुकसान भरपाई मिळाली नाही शेती पिकाचे तर शंभर टक्के नुकसान झाले आहे.

आ. बालाजीराव कल्याणकर आ. मोहनराव हंबर्डे, जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे यांच्यासह अनेक राजकीय पुढा-यांनी नुकसानीची पाहणी केली आहे मात्र प्रत्यक्षात शेतक-यांना कोणतीही आर्थिक मदत मिळाली नाही आता पाहणी बंद करा प्रत्यक्षात नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी पत्रकारांच्या शिष्टमंडळा समोर गावक-यांनी केली आहे.गोदावरीच्या काठावर असलेल्या गावामध्ये अतिवृष्टीमुळे पाणी शिरले या गावांमध्ये घरांची पडझड झाली त्याचबरोबर शेती पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले हे वास्तव असून अनेक भागातील शेतक-यांचे मोठे नुकसान दिसून येत आहे शासनाने त्वरित मदत करावी अशी मागणी नांदेड तालुक्यातील शेतक-याची केली आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या