20.8 C
Latur
Friday, January 22, 2021
Home नांदेड कुंडलवाडी बिलोली रोडवर अपघातात एक ठार तीन जखमी

कुंडलवाडी बिलोली रोडवर अपघातात एक ठार तीन जखमी

एकमत ऑनलाईन

कुंडलवाडी : कुंडलवाडी बिलोली रोडवरील अर्जापूर येथे दोन मोटरसायकलची समोरासमोर जोरदार धडक होऊन एका तरुण उपचारा दरम्यान ठार तर तीन जण जखमी झाले असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.नागेश लखमावाड यांनी दिली आहे.

कुंडलवाडी – बिलोली या राज्य महामार्गावर दुपारी चारच्या सुमारास गाडी क्रमांक एपी 11 जे 48 39 व गाड़ी क्रमांक एम एच 26बी3066 या दोन मोटर सायकलची समोरासमोर जोरदार धडक होऊन बडूर येथील शंकर मारुती कारमोड वय 25 वर्ष रा. बडुर ता बिलोली या तरुणाचा मृत्यू झाला आहे तर जखमी मध्ये लक्ष्मण राजेश्वर हसनवाड वय 21 वर्ष रा. बडुर,नागनाथ इरबस्सा मुंगळे वय 50 वर्ष राहणार डौर,शेख नबु मुहम्मद हुसेन वय 40 वर्ष राहणार डौर हे गभीर रित्या जखमी झाले असून त्यांना ग्रामीण रुग्णालय बिलोली येथे प्राथमिक उपचार करुण पुढील उपचारासाठी नांदेड येथे हालवण्यात आले असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी बिलोली डॉ.नागेश लखमावाड यांनी दिली आहे.

कोरोना संपलेला नाही, काळजी घ्या

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,415FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या