23.8 C
Latur
Saturday, September 25, 2021
Homeनांदेडव्यापा-यासह शिक्षकाला ऑनलाईन गंडा

व्यापा-यासह शिक्षकाला ऑनलाईन गंडा

एकमत ऑनलाईन

नांदेड : शहरातील एका व्यापा-याससह सेवानिवृत्त शिक्षकास अज्ञात भामटयांनी ऑनलाईन गंडा घातला आहे.यात एकाला लिंक तर दुस-याला ओटीपी पाठवून भामटयांनी सव्वा लाख रूपये लंपास केले आहेत.दोन्ही घटना शिवाजी नगर ठाणे हद्दीत घटल्या आहेत.भामटयांच्या या नव्या कारनाम्यामुळे नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रस्त्यावरील नागरिक तसेच महिलांचे दागिणे लुटण्याच्या घटनांचे सध्या सत्र सुरू आहे.यासह वाहने व दुचाकी,घरफोडीच्या घटनाही रोजच घडत आहेत.यामुळे सर्वसामान्य नागरिकांना धाक दाखविणा-या पोलिसांचा गुन्हेगारावरीलच वचक कमी झाला आहे,असे दिसून येत आहे.लुटीच्या आणि चोरीच्या घडना कमी म्हणून की काय आता भामटे नागरिकांना ऑनलाईन गंडा घालत आहे.अशाच दोन घटना दि. २४ जूलैच्या सायंकाळी घडल्या आहेत. गणेशनगर परसिरातील वृंदावन कॉलनीत राहणारे व्यापारी प्रवीण सोनी यांच्या मोबाईलवर एका अज्ञात भामटयाचा फोन आला. त्याने एक एसएमएसद्वारे लींक पाठविली. या लींकला टच करताच प्रविण सोनी त्यांच्या एसबीआय बँक शाखा गुरुद्वारा येथून बचत खात्यातून तब्बल ७१ हजार ८९५ रुपये काढून घेऊन फसवणूक केली.

हा प्रकार प्रविण सोनी यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने शिवाजीनगर पोलिस ठाणे गाठून घडलेला फसवणुकीचा प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी त्यांच्या फियार्दीवरुन अज्ञात हॅकरविरुद्ध फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तर दुस-या घटनेत यशवंतनगर येथील सेवानिवृत्त शिक्षक प्रकाश शिंदे यांना एका निनावी व्यक्तीचा बीएसएनएल कंपनीतून बोलतो असे म्हणून फोन आला. आपल्या मोबाईलवर आलेला ओटीपी टाकायला सांगितला. ओटीपी मिळताच प्रकाश शिंदे यांच्या खात्यामधून चक्क ५० हजार रुपये लंपास करण्यात आले.

प्रकाश शिंदे यांनी शिवाजीनगर पोलिस ठाणे गाठून आपली फिर्याद दिली. त्यांच्या फियार्दीवरुन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या दोन्ही घटनांचा तपास पोलिस निरीक्षक अनंत नरुटे करत आहेत. ऑनलाईन फसवणुकीच्या दोन घटना एकाच दिवशी घडल्या आहेत.यामुळे नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे. नागरिकांनी अनोळखी व्यक्तीशी मोबाईलवर संभाषण करताना आपली कुठलीच वैयक्तिक माहिती देऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

 

अतिरिक्त नोटा छापून गरिबांना वाटणार नाही

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या