23.2 C
Latur
Wednesday, June 16, 2021
Homeनांदेडनांदेड जिल्ह्यात केवळ २९४ नवे कोरोना रुग्ण

नांदेड जिल्ह्यात केवळ २९४ नवे कोरोना रुग्ण

एकमत ऑनलाईन

नांदेड : जिल्ह्यात सोमवारी प्राप्त झालेल्या १ हजार ९३६ अहवालापैकी २९४ अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे २७३ तर अँटिजेन तपासणीद्वारे २१ अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या ८५ हजार २२५ एवढी झाली असून यातील ७८ हजार १९७ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे.

दिनांक ८ ते १० मे या दोन दिवसांच्या कालावधीत १२ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या १ हजार ७२७ एवढी झाली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.७२ टक्के आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा ९२, बिलोली ६, कंधार १४,मुदखेड २, धमार्बाद ९, परभणी ६, नांदेड ग्रामीण १२, देगलूर १०, किनवट १६, मुखेड १४, यवतमाळ ३, अधार्पूर १२, हदगाव १५, लोहा १६, नायगाव १४, हिंगोली ६, भोकर ७, हिमायतनगर ६, माहूर १०, उमरी १, आदिलाबाद २ असे एकूण २७३ बाधित आढळले. आजच्या बाधितांमध्ये अ‍ॅन्टिजेन तपासणीद्वारे मनपा क्षेत्रात ४, देगलूर ४, मुखेड ४, नांदेड ग्रामीण ३ हिमायतनगर १, अधार्पूर १, कंधार १, बिलोली १, किनवट २ असे एकूण अँन्टिजेन तपासणीद्वारे २१ बाधित आढळले.

आज जिल्ह्यातील ५३८ कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे १२, मनपाअंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरण २५५, धमार्बाद तालुक्यातंर्गत ८, देगलूर कोविड रुग्णालय २, अधार्पूर तालुक्यातंर्गत २६, उमरी तालुक्यातंर्गत ४, खाजगी रुग्णालय ८७, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल १४, मुखेड कोविड रुग्णालय ३०, मुदखेड कोविड केअर सेंटर १९, किनवट कोविड रुग्णालय १३, कंधार तालुक्यातर्गंत १३, बिलोली तालुक्यातर्गंत ५, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय १ , बारड कोविड केअर सेटर ३ , माहूर तालुक्यातर्गंत ११ , हदगाव कोविड रुगणालय २४, लोहा तालुक्यातर्गत १० , मालेगाव टीसीयु कोविड रुग्णालय १, असे ५३८ बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली .

आज ५ हजार १८ कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचारानंतर सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय १४९, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल ८०, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नवी इमारत १०४, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय ३५, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर ७०, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर ६०, देगलूर कोविड रुग्णालय २०, जैनब कोविड हॉस्पिटल व कोविड केअर देगलूर २१, बिलोली कोविड केअर सेंटर १००, हिमायतनगर कोविड केअर सेंटर १२, नायगाव कोविड केअर सेंटर ७, उमरी कोविड केअर सेंटर २३, माहूर कोविड केअर सेंटर १९, भोकर कोविड केअर सेंटर ५, हदगाव कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर ३४, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर २५, कंधार कोविड केअर सेंटर ८, धमार्बाद कोविड केअर सेंटर ३६ , मुदखेड कोविड केअर सेंटर १६, अधार्पूर कोविड केअर सेंटर ११, बारड कोविड केअर सेंटर २७, मांडवी कोविड केअर सेंटर ६, मालेगाव टिसीयु कोविड रुग्णालय ९, भक्ती जंम्बो कोविड केअर सेंटर १७, एनआरआय कोविड केअर सेंटर ४८, नांदेड मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण १ हजार ३८४ नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातंर्गत गृहविलगीकरण १ हजार ७०१, खाजगी रुग्णालय ९९०, असे एकूण ५ हजार १८ उपचार घेत आहेत.
आज रोजी सांयकाळी ५ वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे १५, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे ४९, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे ५४, भक्ती जम्बो कोविड केअर सेटर २९ खाटा उपलब्ध आहेत. आजच्या घडीला ५ हजार १८ रुग्ण उपचार घेत असून १८३ बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

लॉकडाऊनमध्ये पुन्हा वाढ?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या