25.5 C
Latur
Monday, September 27, 2021
Homeनांदेडकेवळ ६ जण कोरोना बाधित

केवळ ६ जण कोरोना बाधित

एकमत ऑनलाईन

नांदेड : जिल्ह्यात मंगळवारी प्राप्त झालेल्या १ हजार २१३ अहवालापैकी ६ अहवाल कोरोना बाधित आले आहेत. मागच्या दोन अठड्यापासुन रूग्ण संख्या स्थिरावली असुन दिवसाखेर केवळ दहाच्या आतच नवे रूग्णांची नोंद होत आहे. तर यशस्वी उपचारानंतर रूग्ण बरे होण्याच्या प्रमाणातही चांगली वाढ झाली आहे.

मंगळवारी एकूण प्राप्त अहवालापैकीआरटीपीसीआर तपासणीद्वारे ३ तर अँटिजेन तपासणीद्वारे ३ अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या ९० हजार १६६ एवढी झाली असून यातील ८७ हजार ४६० रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला ५१ रुग्ण उपचार घेत असून यात ३ बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या २ हजार ६५५ एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे मुखेड तालुक्यांतर्गत १, देगलूर १, लोहा १ तर अँटिजन तपासणीद्वारे नांदेड मनपा १, नांदेड ग्रामीण १, कंधार १ असे एकूण ६ बाधित आढळले.

मंगळवारी जिल्ह्यातील ४ कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड १, देगलूर कोविड रुग्णालय १, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरणातील २ व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. मंगळवारी ५१ कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी ५, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल १, देगलूर कोविड रुग्णालय २, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण ४, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण ३९ व्यक्ती उपचार घेत आहेत.

मंगळवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे १२८, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे १४४ खाटा उपलब्ध आहेत. संभाव्य तिस-या लाटेचा धोका ओळखून जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी मंगळवारपासून सुपर स्प्रेडरमध्ये मोडणा-यांचे कोरोना चाचणी सुरु करण्याचे आदेश दिले आहेत.

 

कोंडी परिसरात बिबट्या सदृश प्राण्याचे ठसे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या