23.2 C
Latur
Saturday, September 25, 2021
Homeनांदेडज्ञानमंदीरे उघडा; पालकांचा टाहो

ज्ञानमंदीरे उघडा; पालकांचा टाहो

एकमत ऑनलाईन

माहुर : कोरोना महामारीने अक्क जग हैरान झाले होते त्या मध्ये कोरोना रोगाची साखळी तोडण्यासाठी शासन,प्रशासन वेगवेगळे उपाय करीत होती,परंतु वाढता पादुर्भाव लक्षात घेत अखेर ताळेबंदी करण्याचा निर्णय घेतला गेला.यामध्ये शाळा,विद्यालय,मंदीरे, मॉल बंद केले, लादण्यात आलेल्या तांळेबंदी मुळे कोरोना रोगावर ब्रेक तर बसला परंतु गोरगरीब,सर्व सामान्य नागरिक हवालदिल झाला.या मध्ये सर्वसामान्यांसह शालेय विद्यार्थी व बालकही प्रभावित झाली आहे.सद्या शाळा सुरू करण्याच्या दिशेने शिक्षण विभागाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामूळे विद्यार्थ्यांसह पालकांनाही आता शाळेचे वेध लागले असून शासनाने त्वरीत शाळा सुरू करण्याची मागणी सुज्ञ नागरिकातून व आपल्या पाल्याच्या भविष्याचा विचार करणार्‍या मंडळीकडून जोर धरू लागली आहे.

कोरोना प्रादुभार्वामुळे मागील दोन वषार्पासून वर्ग १ ते ७ चे वर्ग बंद आहे. याचा फटका शिक्षण विभागाला हि बसला आहे. शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. याचा बालकांच्या मानसिकतेवर परिणाम होत आहे. परिणामी त्यांची शिक्षणाची आवड कमी तर होणार नाही ना ? अशी शंका पालकांमध्ये व्यक्त होत आहे. कोरोना महामारीमुळे मागील दोन वषार्पासून शाळा बंद केल्या आहे. दरम्यान कोरोना नियंत्रणात असलेल्या ठिकाणी राज्य शासनाने वर्ग ८ ते १२ वी वर्ग सुरू केले. यामुळे ठप्प पडलेले शैक्षणिक सत्र या वर्षी सुरू झाले. मात्र अद्यापही १ ते ७ वीचे वर्ग सुरू करण्यात आले नाही. मागील दोनवषार्पासून संबंधित वयोगटातील विद्यार्थ्यांची शाळा बंद असल्याने या बालकांच्या मनात शिक्षणाविषयीची गोडी कमी होण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे.

तालुक्यातील ग्रामीण भागात नेटवर्क नाही, काही गावात कव्हरेज असतो, मात्र तो मध्येच तुटत असतो त्यामुळे शिक्षणात अडथळा निर्माण होवून शिक्षणकांचे व विद्यार्ध्यांचे लक्ष लागत नाही. त्यामुळे ऑनलाइन शिक्षण शहरासह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी किंबहुना शिक्षकांसाठी देखील डोकेदुखीचा विषय ठरला आहे,त्यामुळे मंदीरे उडण्यापेक्षा ज्ञानमंदीरे उघडण्याची अर्थ मागणी सद्या सुज्ञ नागरिकातून केली जात आहे.

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या