24.2 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeनांदेडचोरट्या रेतीची खुलेआम वाहतूक

चोरट्या रेतीची खुलेआम वाहतूक

एकमत ऑनलाईन

किनवट : रेती तस्करांनी वेगवेगळी शक्कल लढऊन प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेकत चोरट्या रेतीचा खुल्लेआम वारेमाप पुरवठा चालवला आहे. पावती अमरावती बोरीची, रेतीघाट हिमायतनगर तालुक्यातील दाखवून माहूरमार्गे किनवटमध्ये आली. पावती तपासल्यानंतर चोरटी रेती असल्याचे निष्पन्न झाले. रेतीचे टिप्पर तहसील कार्यालयात लावताना पथकाला हुलकावणी देऊन धूम ठोकत असताना महसूल मंडळाधिकारी एम.जी.काणगुले आणि शिवणी सज्जाचे एन.एस.माळवदे यांनी जोखीम उचलून पुन्हा पकडून अखेर ते टिपर उपविभागीय अधिकारी कार्यालयात लावले.

बैठेपथकाच्या तैनातीशिवाय आवर बसणार नाही. टिप्पर एक पावत्या मात्र दोन असल्यामुळे आता या गंभीर प्रकारावर सहायक जिल्हाधिकारी आणि तहसिलदार काय कार्यवाही करणार ? यावर रेतीतस्करीचे तालतंत्र ठरणार आहे. चोरट्या रेतीचे दररोज किनवट शहरात जवळपास पंचवीस ते तीस टिप्पर येतात. हे सांगण्यासाठी कोणाची गरज वाटत नाही. सारखणी आणि किनवटातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासली तरी सबळ पुरावे दिसतील.

लोकांची ओरड, वृत्तपत्रांनी सातत्याने उठवलेला आवाज यापेक्षा आणखी काय केल्यानंतर प्रशासनाला खात्री होईल. मुद्दत संपल्यानंतरही रेतीची प्रचंड साठेबाजी करुन ख-याखोट्या पावत्यांचा वापर करुन सर्रास रेती किनवट शहरात पुरवतात. तस्करांमध्ये हे धाडस कोणाच्या बळावर आले ? हा एक प्रश्नच आहे. राजायश्रातील दलाल असल्यामुळे यंत्रणा पुढे यायला धजावताना दिसत नाही असा सूर आहे. महसूल यंत्रणेतील कांही कर्मचारी धाडसाने जोखीम उचलून अधूनमधून चोरटी रेती वाहतूक करणारे वाहाने पकडताना दिसतात. त्यात १० जून रोजी स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल मंडळाधिकारी एमा.जी.काणगुले आणि एन.एस.माळवदे यांनी टिप्पर पकडले, त्यांच्या या कार्यवाहीमुळे सर्वत्र स्वागत होतांना दिसते.

एम.जी.काणगुले व एन.एस.माळवदे यांनी माहूरकडून रेतीचे आलेले एम.एच.२९ बी.ई. ५०१० क्रमांकाचे टिप्पर थांबवून पावतीची विचारणा केली तेंव्हा चालकाने एक नव्हे तर दोन पावत्या दिल्याने कर्मचारी चक्राऊन गेले. अनुक्रमांक ७०७ व ७०८ असलेल्या दोन्हीही पावत्यावर इटीपी नंबर (४८८९३३७) हा एकच निघाला. गौण खनिज उत्खनन स्थळ हिमायतनगर तालुक्यातील कामारी असून खरेदी दाराचे नाव व खनिज वापराचे ठिकाण इमरानभाई अमरावती बोरी, एक ब्रास असे लिहले आहे.

वाहतूक परवाना इटीपी तयार झालेला दिनांक ९ जून २०२२ सकाळी ७.५२ असून वाहतूक परवाना इटीपी वैधता कालावधी १० जून २०२२ दुपारी १२.२२ अशी आहे. चालकाच्या नावाचा रखाना निरंक आहे. त्यामुळे अशा पावत्यांचा वापर करून रेतीची अवैध वाहतूक सुरु असल्याचे पुरावा चित्र आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या