21.4 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeनांदेड'दरबार साहेब इमारती'चा वीमा काढण्यास विरोध

‘दरबार साहेब इमारती’चा वीमा काढण्यास विरोध

एकमत ऑनलाईन

नांदेड : गुरुद्वारा सचखंड बोर्डाच्या विषय पत्रिकेत समाविष्ट मुद्द्यानुसार गुरुद्वाराच्या मुख्य इमारतीचा (दरबार साहेब) वीमा काढण्यात यावा असा ठराव ठेवण्यात आला आहे. दरबार साहेब ही अमूल्यवान अशी धार्मिक वास्तु असून मूल्यांकन होऊ शकत नाही. तेव्हा गुरुद्वारा बोर्डार्चे अध्यक्ष स. भूपिंदरसिंघ मनहास यांनी गुरुद्वात उपस्थित राहून क्षमायाचना करावी अशी मागणी पत्रकार स. रविंदरसिंघ मोदी यांनी एका पत्राद्वारे केली गुरुद्वारा बोर्डाच्या अध्यक्षाकडे केली आहे.

गुरुद्वारा तखत सचखंड बोर्डाच्या वतीने आज दि. १३ जून रोजी सकाळी ११ वाजता दरम्यान अर्थसंकपीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत विविध २० मुद्यांवर चर्चा होणार असून बैठकीच्या क्रमांक २० वर गुरुद्वारा तखत सचखंड बोर्डाच्या मालकीच्या सर्व इमरतींचा वीमा काढण्यात यावा. तसेच गुरुद्धाराच्या दरबार साहेब या पूर्ण इमारतीचा वीमा काढण्यात यावा. असा विषय ठेवण्यात आला आहे.हा निर्णय शीख धर्माच्या धार्मिक तत्वांशी असंगत असल्याची प्रतिक्रिया रवींद्रसिंघ मोदी यांनी नोंदवत बोडार्चे अध्यक्ष भूपिंदरसिंघ मनहास यांना प्रश्न विचारला आहे की वीमा काढण्यासाठी या धार्मिक, ऐतहासिक वास्तुचे मूल्यमापन कोणत्या आधारे करण्यात येत आहे? वीमा काढण्याचे निकष कोणते ठेवण्यात आले आहे.

वरील वास्तु शेर-ए-पंजाब महाराजा रणजीतसिंघ जी यांनी निर्मित केलेली असून येथे श्री गुरु गोबिंदसिंघ जी महाराज यांचा पवित्र पावन अंगीठा साहेब विद्यमान आहे. तसेच वरील ठिकाणी श्री गुरु गोबिंदसिंघ जी यांनी सन १७०८ मध्ये श्री गुरु ग्रंथसाहेब यांना अटल गुरुची पदवी देऊन गुरुगादी प्रदान केली होती. तेव्हा दरबार साहेब या वास्तुचे मूल्यांकन करता येणार नाही एक शीख म्हणून तसे करणे देखील शक्य नाही. गुरुद्वाराच्या निर्मितीसाठी शीख समाज नेहमी कष्टाने मिळवलेल्या मिळकतीचे (दसवंध) वापर करतो. तेव्हा गुरुद्वारा बोर्डार्चे अध्यक्ष यांनी धार्मिक मान्यतेकडे दुर्लक्ष्य केले असून त्यामुळे असंख्य भाविकांच्या श्रद्धेला ठेस लागली आहे.यामुळे गुरुद्वारा बोर्ड अध्यक्ष भूपिंदरसिंघ मनहास यांनी तखत सचखंड हजूर साहेब गुरुद्वात उपस्थित होऊन माफी मागावी असे रवींद्रसिंघ मोदी यांनी पत्रात नमूद केले आहे. गुरुद्वारा बोर्डाच्या यात्री निवासांच्या इमारतींचा वीमा काढायला आमच्या विरोध नाही असे ही त्यांनी पत्रकात म्हंटले आहे.

गुप्तधन काढण्याचा प्रयत्न; आठ जणांवर गुन्हा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या