30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeनांदेडभोकर तालुक्यात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढला

भोकर तालुक्यात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढला

एकमत ऑनलाईन

भोकर : तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढण्यास सुरुवात झाली असून दररोज कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण दुपटीने वाढत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहेत. यापूर्वी भोसी या गावात १०० च्या वर रुग्ण पॉझिटिव आढळले होते तर आता दोनच दिवसात सोनारी या गावात ५० रुग्ण कोरोना पॉझिटिव मिळाल्याने भोसी नंतर सोनारी हे गाव तालुक्यातील हॉटस्पॉट ठरते की काय ? अशी शंका निर्माण झाली आहे.

तालुक्यात प्रशासन नागरिकांना कोरोना महामारी पासून बचाव करण्यासाठी त्रिसूत्रीची अंमलबजावणी करण्याचे आवाहन करीत आहे. तोंडाला मास्क, सोशियल डिस्टन्सचे पालन व नियमित स्वच्छ साबणाने हात धुणे याबाबत गावागावात जनजागृती करण्यात येत आहे. तरीही नागरिकांच्या बेफिकिरी वृत्तीमुळे कोरोना शहरासह ग्रामीण भागातही आता आपले पाय मोठ्या प्रमाणात पसरायला सुरुवात केली आहे. नको तिथे गर्दी करणे, तोंडाला मास्क न बांधणे व सोशियल डिस्टन्स चे नियम न पाळणे या बाबी प्रामुख्याने सर्वत्र आढळून येत आहेत.

दिनांक ७ व ८ एप्रिल या दोनच दिवसांत तालुक्यातील सोनारी येथे ५० कोरणा पॉझिटिव रुग्ण आढळल्याने प्रशासन खडबडून जागे होऊन गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्तीचे अध्यक्ष, सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन आदी प्रमुख जबाबदार व्यक्तीशी चर्चा करून गावात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव कसा रोखला जाईल याविषयी नियमाचे काटेकोर पालन करण्यासंदर्भात गावकर्यांना प्रशासनामार्फत आवाहन करण्यात येत आहे. तहसीलदार भरत सूर्यवंशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राहुल वाघमारे, आरोग्य कर्मचारी गावात जाऊन परिस्थितीची पाहणी करून योग्य त्या सूचना ग्रामस्थांना देत आहेत.

गाव पातळीवर गावाची देखभाल करणारा कर्मचारीवर्ग तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी यांची मात्र प्रामुख्याने अनेक गावांमध्ये गैरहजेरी दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच व सदस्य यांच्यावर कमालीचा ताण येत आहे. तेव्हा वरिष्ठांनी त्वरित या गंभीर बाबीकडे लक्ष घालून गावातील सर्व कर्मचा-्यांना मुख्यालयी हजर राहणे सक्तीचे करावे. तालुक्यात गेल्या तीन दिवसात १०० पेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने परिस्थिती हळूहळू गंभीर बनत चालली आहे. तालुक्यात मोघाळी, भोसी व किनी या तीन प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत कोव्हिड प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली असून ग्रामीण भागात ब-्यापैकी लसीकरणाला ४५ वर्षावरील नागरीकांचा व महिलांचा प्रतिसाद मिळत आहे. परंतु अजूनही काही जुन्या विचारसरणीचे लोक लस घेण्यास विरोध करत आहेत. तेव्हा त्यांचं मतपरिवर्तन करण्यासंदर्भातही मोहीम राबवणे आवश्यक आहे.

भोकर शहरातील विविध नगरात तसेच सोनारी ,भोसी, मोघाळी, हसापुर, रावणगाव, लगळुद, हाळदा, कामणगाव, हाडोळी,लामकाणी, किनी,पाळज, रिठा, बेंबर, बेंद्री, दिवशी आदी ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. तेव्हा या सर्व गावांमध्ये कोव्हिड प्रतीबंधक नियमांचे काटेकोर पालन कसे होईल याकडे गावातील ग्रामपंचायत व प्रशासनाने वेळीच लक्ष घालने गरजेचे बनले आहे.

जि.प.अध्यक्षांना जिवे मारण्याचा प्रयत्न!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या