22.9 C
Latur
Wednesday, July 28, 2021
Homeनांदेडवर्षेभरानंतर अतिक्रमण हटाव नाट्य सुरू

वर्षेभरानंतर अतिक्रमण हटाव नाट्य सुरू

एकमत ऑनलाईन

नांदेड : शहरातील मुख्य रस्त्यासह विविध फुटपाथावर मोठया प्रमाणात अतिक्रमण झाले आहे.यामुळे नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. वर्षभरानंतर जागे झालेल्या महापालिकेच्या पथकाकडून गुरूवारी सकाळी छ.शिवाजी महाराज पुतळा ते रेल्वेस्थानक रस्त्यावरील हातगाडे वाल्यांचे अतिक्रमण हटविण्यात आले.मात्र पथक पुढे जाताच अतिक्रमण जैसे थे झाले आहे.

शहरातल प्रमुख रस्त्यांसह शेजारी असलेल्या फुटपाथांवरील टपरीधारक, हातगाडे, दुकानदारांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. अत्यंत गर्दीची बाजारपेठ असलेल्या जुनामोंढा, टॉवर, वजिराबाद, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद व न्यायालय परिसरातील रस्ता असलेल्या रेल्वेस्थानक मार्गासह शिवाजीनगर, नईआबादी आदी भागात रस्त्यालगत नागरिकांना चालण्यासाठी तयार करण्यात आलेले मोठे फुटपाथ अतिक्रमणाच्या विळखयात गायब झाले आहे. यात फुलेमार्केट, रेस्टहाऊ स येथील रस्त्यावरील अतिक्रमाणाची भर पडली आहे.

यामुळे नागरिकांना वाहनाच्या गर्दीत जीव धोक्यात घालून चालावे लागत आहे. लॉकडाऊ नमुळे रस्ते मोकळे होते परंतु आता अतिक्रमण धारकांनी फुटपाथ व रस्त्यावर ठाण मांडले आहे. तब्बल वर्षे, दिडवर्षानंतर झापलेल्या महानगरपालिकेच्या पथकाला आता जाग आली आहे. यामुळे गुरुवारी सकाळी छ.शिवाजी महाराज पुतळा ते रेल्वेस्थानक रस्त्यावरील काही हातगाड्यांचे अतिक्रमण हटविण्यात आले. मात्र काही वेळानंतर हे अतिक्रमण जैसे थे दिसून आले. यामुळे मनपाची अतिक्रमण हटाव नाट्य मोहिम पुढे कायम राहिल का असा सवाल नागरिकातून उपस्थित केला जात आहे.

दारू पिण्यास विरोध केल्याने पतीने केला पत्नीचा खून

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या