21.4 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeनांदेडपालखी सोहळा रद्द ; मार्गावरील वारक-यांना दिंड्यांचा विरह

पालखी सोहळा रद्द ; मार्गावरील वारक-यांना दिंड्यांचा विरह

एकमत ऑनलाईन

देगलूर (नरसिंग अन्नमवार ) : संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणारा ज्ञानोबा-तुकोबा सह अन्य संतांच्या दिंड्या पालख्या याहीवर्षी वाजत गाजत मिळणार नसल्याचे दिसून येत आहे. सलग दुस-या वर्षी देखील आषाढी महावारी ला कोरोना महामारी जाडसर दिसत आहे. वारकरी बरोबर पालखी महामार्ग नाही सोहळ्याचा विरह सहन करावा लागणार असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे .घरीच रहा, सुरक्षित रहा हीदेखील विठू माऊलीची च ईच्छा असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

कुणाला निमंत्रण नाही कुणाला आग्रह नाही तरीदेखील आषाढी वारी आली की लाखो भाविकांना ओढ असते ती माऊली पालखी सोहळा सोबत पायी चालत जाण्याची कित्येक निष्ठावंत वारकरी घरी ची सोय गरसोय याची तमा न बाळगता आहे. तसा ओळखती बांधतो आणि देहू आळंदी ला पोहोचतो हे दोन्ही पालखी सोहळे म्हणजे महाराष्ट्राच्या आध्यात्मिक वैभवच मानले जातात लाखो भाविक एकदा का रस्त्यावर चालू लागले की आसमंत सुद्धा टाळ-मृदंगाच्या अभंगाच्या गाण्याने पळून जातो. वारी करताना जे आत्मिक समाधान लागते त्याचा अनुभव वारीत आल्यावरच कळतो. महाराष्ट्र-कर्नाटक नव्हे देश-विदेशातील लोक हा विलोभनीय सोहळा अनुभवण्यासाठी सामील होत असतात मात्र गेल्या वषार्पासून कोरूना नावाच्या महामारी हे सर्व रस्ते बंद केले आणि परंपरेला आणि भावनेला मुरड घालावी लागली.

आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगतसे गुजर पांडुरंगा असे असले तरी या महामारी ने मंदिराचे दरवाजे बंद केले आणि माणसं सुद्धा घरातच डांबून ठेवली होती दोन लाटा आल्या आणि कित्येकांना जगाचा निरोप घ्यावा लागला आता तिस-या संभाव्य लाटेची भीती व्यक्त केली जात आहे म्हणून सावध पवित्रा घेत यावर निर्बंध आणले जात आहे.

लाखोंचा जनसमुदाय एक-दोन दिवस नव्हे तब्बल तीन आठवडे रस्त्यावरून एका भक्तीच्या ऊर्जेत चालत असतो त्यांना कोरूना ची बाधा होऊ नये म्हणून सावधगिरी म्हणून परंपरेला गालबोट न लागता मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी हे सोडविना गरजेची जातील आणि येथील मात्र वारकरी या सोहळ्यात नसल्याने तो जल्लोष दिसणार नसल्याने वारकरी कष्टी आहेत. वषार्तून एकदा महामार्ग भक्तिप्रेमात ओलाचिंब होत असतो त्यालाही हा विरह सहन करावा लागणार आहे.आळंदी, देहू, त्रंबकेश्वर, सासवड, मेहून एदलाबाद, पैठण अशा पालखी सोहळा बरोबरच अन्य साधुसंताच्या दिंड्या पालख्या जात असतात.

देगलूर तालुक्यातील लोणी ,हाणेगाव देगलूर,करडखेड, मालेगाव, मरतोळी, वळग अशा अनेक गावातून या मोठ्या दिंड्या ही प्रतिवर्षी जात असतात. या शिवाय लहान दिंड्या वेगळ्याच मिळून पंढरपूरला चहुबाजूंनी वारक-यांचा महापूर लुटत असतो हे सर्व विलोभनीय चित्र याहीवर्षी दृष्टिआड होणार आह. हे वेदना सहन होत नाही ; मात्र त्या सोसाव्या लागणार असल्याने घरीच पायीवारी मानस पुजा पार पाडावी लागणार आहे. यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे आषाढी वारीसाठी मर्यादा घातली असून पायी दिंडी सोहळा हे रद्द करण्यात आल्यामुळे वारी मार्गावरील नागरिकांना यावर्षी दिंडी येत नसल्यामुळे विरह पडला आहे.

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या