माळाकोळी: माळाकोळी येथील एका वृद्ध महिलेचा नांदेड येथे उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, श्वसनाचा त्रास व ताप आल्यामुळे नांदेड येथे उपचारासाठी दोन दिवसापुर्वी दाखल केल्यानंतर उपचारा दरम्यान मृत्यु झाला़ यावेळी कोरोणा सदृश्य लक्षणे आढळल्यामुळे कोरोणा चाचणी केली असता मृत्युनंतर कोरोणा चाचणी पॉजीटिव्ह आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.याबाबत आरोग्य विभागाचे अधिकारी सतर्क झाले असुन उपाययोजना सुरु आहेत.
माळाकोळी येथील प्रतिष्ठीत कुटुंबातील महिला वय ६३ यांना मागील दोन दिवसांपासुन श्वसनास त्रास, ताप येणे असा त्रास होत असल्यामुळे गावातील खाजगी दवाखाण्यात प्राथमीक उपचार करुन नांदेड येथे दाखल करण्यात आले, प्रारंभी नांदेड येथे खाजगी रुगणालयात दाखल केल्यानंतर तेथील डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर त्यांना नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे दाखल करण्यात आले, यावेळी उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यु झाला असुन मृत्युनंतर त्यांचा कोरोणा चाचणी अहवाल पॉजीटिव्ह आला आहे.
मागील काही दिवसांपुर्वी माळाकोळी येथील पोलीस ठाण्यातील एक कर्मचारी व एक अधिकारी कोरोणा पॉजीटिव्ह आढळल्यानंतर अनेकांचे स्वॅब घेण्यात आले होते ते सर्व अहवाल निगेटिव्ह आले होते. मात्र सदर महिलेला कोरोणा विषाणु बाधा कशी झाली याबाबत अधिक माहीती मिळु शकली नाही, यासंदर्भार्ने प्रसासन चौकशी करत आहे. घरी आलेल्या पाहुणीमुळे ही बाधा झाली असावी असा प्राथमीक अंदाज असल्याचे वैद्यकीय अधिकारी धनगे यांनी सांगीतले आहे. कुटुंबातील ईतर सदस्य व शेजारी यांचे स्वॅब घेतले जात असुन काहींना क्वॉरंटाईन करणार असल्याचे आरोग्य विभागाकडुन समजले.
Read More ऑक्सिजन न मिळाल्याने रुग्णाचा मृत्यू आरोग्य सेवेचा उडाला पुरता बोजवारा