कुंडलवाडी : प्रतिनिधी
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देश भरातील विध्यार्थ्यासोबत परिक्षापर चर्चा या विषयावर मार्गदर्शन केले. यावरून हे सिद्ध होते की देशाचे पंतप्रधानाचे लक्ष विद्यार्थ्याकडे सुद्धा आहे. विद्यार्थ्याकडून पालकांनी अपेक्षा बाळगावे पण जास्तीची अपेक्षा करू नये. ज्यामुळे विद्यार्थी मनावर विपरीत परिनाम होणार नाही याकडे पालकानी लक्ष द्यावे. पाल्य शिक्षकांचा सानिध्यात पाच ते साहा तास असतो बाकी पुर्ण वेळे आई वडील यांच्या सानिध्यात राहतो यामुळे आई वडीलांनी मुलांकडे लक्षदेणे आवश्यक आहे असे मत के.रामलू पब्लिक स्कूलच्या दुस-या दिवसच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोपात लक्ष्णराव ठक्करवाड मा.जिल्हा परिषद सदस्य नांदेड यांनी प्रतिपादन केले.
या कार्यक्रमास उदघाटक म्हणून साईनाथ उत्तरवार चेअरमन सेवा सहकारी सोसायटी कुंडलवाडी,प्रमुख पाहूणे साहेबराव बागुलवाड सेवानिवृत्त उत्पादन शुल्क अधिकारी,सय्यद सिराज पट्टेदार शहर युवक काँग्रेस अध्यक्ष,लक्ष्मणराव म्याकलवार खरेदी विक्री संघ संचालक बिलोली आदी उपस्थित होते. पुढे बोलताना ठक्करवाड म्हणाले गेल्या दहा बारा वर्षा पुर्वी छोट्याशा ईमारतीत चालू झालेली ह्या शाळेचा आज मोठ्या वटवृक्षात रूपांतर झाल्याचे आपण पहात आहोत.या शाळचे संस्थाचालक सायरेड्डी ठक्कूरवार,त्याची सौभाग्यवती रमा ठक्कुरवार,मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंद यांच्या परिश्रमाने या शाळेचे विध्यार्थी नाव लौकीता प्राप्त करीत आहे.विविध क्षेत्रात विध्यार्थी यश प्राप्त करीत आहे.तरी विध्यार्थी शिक्षण घेत असताना नौकरी मिळविण्यासाठी किंवा पोटभरण्यासाठी शिक्षण न घेता त्या सोबत संस्काराचीसुद्धा अत्यंत आवश्यकता आहे आणि ती गरज हि शाळा गेल्या दहा बारा वर्षा पासून जपत आहे.
विध्यार्थ्यी परिक्षेचा काळात दडपणा खाली असतात यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी देश भरातील विध्यार्थ्यासोबत परिक्षापर चर्चा या विषयावर मार्गदर्शन केले.यावरून हे सिद्ध होते की देशाचे पंतप्रधानाचे लक्ष विध्यार्थ्याकडे. सुद्धा आहे हे दिसून येते.तसेच विध्यार्थ्यांना,पालक, शिक्षकवृंद मार्गदर्शन करीत असतात.
विध्यार्थ्याकडून पालकांनी अपेक्षा बाळगावे पण जास्तीची अपेक्षाकरूनय ज्या मुळे त्या विध्यार्थी मनावर विपरीत परिनाम होणार नाही याची दक्षता घ्यावी असा मोलाचा संदेश पण यावेळी ठक्करवाड पालकांना दिले.तसेच पालकांनी सुद्धा लक्षात घेतले पाहीजे आपल्या पाल्याची क्षमता काय आहे.पाल्याचा श्रमते प्रमाणे पालकानी अपेक्षा ठेवावे.विध्यार्थी शिक्षकांचा सानिध्यात पाच ते साहा तास असते बाकी पुर्ण वेळे प्रथम गुरू आई वडील यांच्या सानिध्यात राहतात यामुळे आई वडील मुलांकडे लक्षदेणे आवश्यक आहे असे म्हणत पुढे म्हणाले के.रामलू शाळेत गेल्या दोन दिवसापासून संस्कृत कार्यक्रम चालू आहे.आपण आपल्याचे,मुलांचे कौतुक करण्यासाठी आल्यात ही शाळा अत्यंत चांगली असून येथील शिक्षकवृंद सर्वगुणसंपन्न आहे.मेहनती आहे.म्हणूनच परिसरातील पंचविस गावातील विध्थार्थी शिक्षण घेण्यासाठी या ठिकाणी येतात.चागले विध्यार्थी घडत आहे.याबद्दल लक्ष्णराव ठक्करवाड शाळेचे संस्थापक अध्यक्ष सायरेड्डी ठक्कूरवार,त्याची सौभाग्यवती रमा ठक्कुरवार,मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंदांचे आभार व्यक्त केले.आणि शेवटी महाशिवरात्रीनिमित्त उपस्थिताना सुभेच्छा दिले.
यावेळी साईनाथ उत्तरवार,साहेबराव बागुलवाड आपापले विचार मांडले. दुस-या दिवसाचा संकृत कार्यक्रम झाडे लावा झाडे जगवा,पक्षीप्रेम,पुलामा हल्ला,शुरराणी लक्ष्मीबाई यांच्या शौर्यवार नाटीका सादर केले.यासह आध्यात्मिक,देशभक्ती गित,लावण्या,सह मराठी,हिंदी,तेलगु गाण्यावर आपले कलागुण सादर करीत शहर व परिसरातील पालक व रसिक प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद मिळविले यावेळी रसीक लहान बालकांच्या कलागुणांना दाद देत त्यांचे कौतुक केले आहे. कार्यक्रमाचे प्रस्ताविक शाळेचे अध्यक्ष सायरेड्डी ठक्कूरवार मांडले.सुत्रसंचलन कांगळेसर तर आभार मुख्याध्यापक मठवाले मानले.