22.5 C
Latur
Wednesday, December 8, 2021
Homeनांदेडनादुरूस्त बसगाड्यांना कर्मचा-यांसह प्रवासी वैतागले

नादुरूस्त बसगाड्यांना कर्मचा-यांसह प्रवासी वैतागले

एकमत ऑनलाईन

कंधार (सय्यद हबीब) : एसटी महामंडळाचे कंधार आगार जुनाट व सतत नादुरुस्त होत असलेल्या बसगाड्या या आगाराच्या सेवेत डोकेदुखी ठरत आह. हा प्रकार येणा-या प्रवाशांच्या जीवाशी खेळ करणारा असून याबाबत तातडीने कारवाई करणे गरजेचे आहे अशी मागणी केली जात आहे. कंधार नांदेड बस दोन दिवसापूर्वीच कंधार आगाराच्या हाकेच्या अंतरावर नादुरुस्त झाल्याचा प्रकार घडला असता याबाबत एकमतने बातमी प्रकाशित केली होती याबाबत वरिष्ठ अधिका-यांनी दुर्लक्ष केल्याने पुन्हा कंधार नांदेड बस पांगरा मार्गे दि.२० रोजी बुधवारी सायंकाळी ५ वाजता चाळीसच्या आसपास प्रवासी घेऊन जाणारी एमएच २० बीएल १६५६ या क्रमांकाची बस पांगरा येथे बंद पडली.

त्यामुळे दीड तास प्रवाशांना दुस-या गाडीची वाट पाहत ताटकळत बसावे लागले तर काही प्रवाशांनी आगार व्यवस्थापकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते फोनही उचलत नसल्याचे प्रवासी मंसुर पठाण यांनी सांगितले. त्यामुळे त्यांनी एकमत प्रतिनिधीशी संपर्क साधून याबाबत आपले गा-हाणे मांडले असता एकमत प्रतिनिधींनी बस स्थानकात जाऊन आगार व्यवस्थापकाशी विनंती केली असता दुसरी बस त्यामार्गे ६.३० वा. पाठवण्यात आली त्यामुळे विनाकारण दीड तास प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

कंधार आगारात जवळपास ६० ते ६५ बसगाड्या असून यातील बहुतांश गाड्या खिळखिळ्या झालेल्या आहेत. याबाबत काही चालकांना विचारना केली असता नोकरी करायची आहे . म्हणून नादुरुस्त वाहनेही नाईलाजाने आम्हाला हाकावी लागतात बस गाड्यांना समोरचे टायर रिमोल्ड केलेले वापरले जात आहेत, इंजिन ऑईल नाही, काळे आईल वापरून इंजिन खराब झाली आहेत तर आठ गाड्या चे इंजिन फुटले असून बस दुरुस्तीला लागणा-या पार्टसची कमतरता असते. तर बसच्या चाकाच्या डिस्कवर असलेले एक्सल ला आठ नट असतात पण कंधार आगारातील बहुतेक बस गाडीला तीन, चार नटवर गाड्या चालवल्या जात आहेत. अशा अनेक समस्यांमुळे वाहनात अडथळे येऊन याचा परिणाम सेवा देण्यावर होत आहे. शिवाय काही अपघात झाल्यास याचा फटका मात्र आम्हाला येतो व अनेकदा आमच्यावर कारवाई केली जाते. याबाबत ठोस कारवाई व्हायला हवी असे न छापण्याच्या अटीवर कर्मचा-यांने सांगितले.

प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य असलेल्या एसटी महामंडळाला जुनाट नादुरुस्त किरकोळ दुरुस्त्या करून गाड्या रस्त्यांवर चालवणे हे प्रवाशांच्या जीवाशी खेळ करणे असेच आहे गाड्या त्याही रिमोट टायर लावून नेमक्या कोणाच्या आदेशाने व का चालवले जातात याची सखोल चौकशी व्हायला हवी आणि ढिसाळ व नियोजन शून्य व्यवस्थापन, कामात हलगर्जीपणा करून सदोष बस मार्गस्थ करणा-या कर्मचा-यांसह अधिका-याची खातेनिहाय चौकशी करावी अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

मी कंधार आगारातून कंधार नांदेड बसने पुढे भोकरला जाण्यासाठी बस मध्ये बसलो असता डिझेल टँंकमध्ये गळती येऊन पांगरा येथे बस बंद पडली. बस चालकाने प्रवाशांना बसमधून खाली उतरवून बस सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र प्रयत्न निष्फळ ठरले बस मध्ये एक महिला रुग्ण तर दोन बालरुग्ण होते तर काहींना पुढील प्रवासाकरिता नांदेडला वेळेत पोहोचणे गरजेचे होते त्यामुळे आम्हा सर्वांना खूप मानसिक त्रास सहन करावा लागला. महत्त्वाचे म्हणजे आम्हाला उशीर होत असल्याने चालकाने कोणालातरी बस लवकर पाठवा म्हणून फोन केले असता प्रवाशांना माझा नंबर का देतोस म्हणतं कुणीतरी चालकाला ओरडत असल्याचे दिसून आले . कंधार आगाराचा कारभार नियोजनशून्य असल्याने प्रवाशांना विनाकारण हाल-अपेष्टा सहन करावे लागत असल्याचे यावेळी सांगितले.
– शेख आरेश महेबुब, प्रवासी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या