23.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeनांदेडअनाथ आरतीच्या लग्नाला पतंगे यांची मदत

अनाथ आरतीच्या लग्नाला पतंगे यांची मदत

एकमत ऑनलाईन

हदगाव : डोंगरगांव येथील अनाथ आरती हिच्या लग्नासाठी हदगांव तालुक्यातील कोळी येथील युवक परमेश्वर पतंगे यानी वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ कन्यादानरूपी संसारपयोगी साहित्य देऊन दायित्व निभावले आहे.

समाजामध्ये बलाढ्य एकापेक्षा एक श्रीमंत व्यक्ती आहेत. प्रत्येकजण पैस्याच्या मागे धावताना बघावयास मिळते. पैशासाठी वाटेल ते करायला प्रत्येकजण तयार असते. त्यातही काही चांगले लोक असतात. असाच निवघा येथील व्यापारी मुळगांव कोळी ता. हदगांव येथील व आशादीप ग्रुपचा सदस्य परमेश्वर पतंगे याने कोरोना काळात आपल्या वडिलाला गमाविले! वडिल रुस्तुम पतंगे याना कोरोनाची लागण झाली होती. १७ लाख खर्चुनही वडिल वाचु शकले नाहीत. मग पैसा करायचा तरी काय? पैसे असुनही माणसे मरतात? वडिल स्वर्गवाशी झाल्यापासून दररोज गल्यामध्ये काही पैसे शिल्लक टाकत वडिलाच्या स्मृतिप्रित्यर्थ व्यर्थ खर्च न करता, गरीबाच्या लग्नासाठी खर्ची घालायचे हा हेतू डोळ्यासमोर ठेवून परमेश्वर पतंगे यानी कळमनुरी तालुक्यातील डोंगरगांव (पुल) येथील वडिलाचे छत्र हरविलेल्या आरती या अनाय मुलिच्या लग्नाला लागणारे संसारपयोगी साहित्य भेट देऊन आपल्या वडिलाची पृथम पुण्यतिथी केली.

व दरवर्षी गरीब व अनाथ मुलिचे लग्न करायचे हा माणस असल्याचे सांगीतले. अनाथ आरतीचे वडिल गेल्यावर्षी कोरोना काळात वारले. आरतीला सहा बहिणी व एक भाऊ असून आई रोजमजुरी करते. आरती उपवर झाल्याने तिचे लग्न ंिपपरी येथील पांडूरंग पवार या युवकाशी ता.२७ मे रोजी होणार असल्याने आरतीच्या आईने मदतीचे आवाहाण केले होते. हे आवाहन परमेश्वर पतंगे यानी पेलल्याने हा विवाह पार पडणार आहे. परमेश्वर यानी केलेल्या मदतीचे सर्वत्र कौतूक होत आहे. यावेळी हरिषचंद्र चिल्लोरे, परमेश्वर पतंगे, प्रदिप चिल्लोरे, संतोष कदम, पत्रकार बंडू माटाळकर, सुदर्शन क-हाळे आरतीसह आरतीची आई, मामा व भाऊ उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या