लोहा : लोहयाच्या कोविड सेंटरमध्ये अपु-या कर्मचा-्यांमुळे सुविधेचा अभाव रुग्णाची होत आहे हाल बेजबाबदार प्रशासन व लोकप्रतिनिधी देतील का ध्यान असा संतप्त सवाल लोहयाचे प्रथम नगराध्यक्ष कै. माणिकराव पाटील पवार यांचे नातू तथा युवा समाजिक कार्यकर्ते सुधाकर पाटील पवार यांनी यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
पुढे बोलताना सुधाकर पाटील पवार म्हणाले की, मोठा गाजावाजा करून लोह्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय व कोविड सेंटर सुरू करण्यात आली परंतु खोदा पहाड निकला चूहा याप्रमाणे सगळे फेल झाले असून या कोविड सेंटर मध्ये रुग्णाची बेहाल होत आहे. सुविधेचा मोठा अभाव आहे. शासनाच्या वतीने कोरोना मुक्त करण्यासाठी रुग्णालयाला प्रचंड प्रमाणात निधी येत आहे राज्यात बाकीचे विकास कामे शासनाने खोळंबत ठेवले आहेत. नागरिकांच्या आरोग्याला प्रथम प्राधान्य देत सर्व निधी कोरोनासाठी कोविड सेंटरसाठी वापरण्यात येत आहे.
जनतेच्या जीवावर मोठे झाले पण जनतेच्या आरोग्याकडे त्यांचे लक्ष राहिले नाही.लोहयाच्या कोवीड सेंटरमध्ये कसल्याही प्रकारच्या चांगल्या सुविधा नाहीत. याकडे आता स्वत: राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्वत: जातीने लक्ष द्यावे कामचुकार अधिकारी कर्मचा-यावर कठोर कारवाई करावी व लोहयाच्या कोविड सेंटरकडे लक्ष देऊन रुग्णाला चांगल्या सोयीसुविधा व औषधोपचार , जेवणाची व्यवस्था, शुद्ध पाण्याची व्यवस्था करून द्यावी व त्यांचे प्राण वाचवावे अशी मागणी युवा सामाजिक कार्यकर्ते सुधाकर पाटील पवार यांनी केली आहे.
भयंकर :आधी बकरीचे मुंडके छाटले, आता बायकोचे मुंडके छाटून ते जमीनीत पुरले!