22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeनांदेडकोरोना महामारीत खा.पाटील यांचे हदगाव तालुक्याकडे दुर्लक्ष

कोरोना महामारीत खा.पाटील यांचे हदगाव तालुक्याकडे दुर्लक्ष

एकमत ऑनलाईन

निवघाबाजार:  हदगांव तालुक्यात कोरोना विषाणु संसर्गित तिन रुग्न आढळले असून त्यामध्ये निवघा सर्कल मधिल पेवा येथील महीला ही कोरोणा संसर्गित भोकर येथील मृत महीलेच्या घरच्यांच्या संपर्कात आल्याने कोरोणा पॉझीटीव्ह आली आहे. त्यामुळे निवघा बाजार सर्कल मध्ये खळबळ उडाली असून शेजारील गावातील नागरीकांना सर्तक व सुरक्षीत राहण्याचा सुचना देण्यात आल्या आहेत. परिसरातील नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

परिसरातील पेवा येथे हदगांव तालुक्याचे उपविभागिय अधिकारी महेश वडदकर, तहसिलदार जिवराज दापकर, आरोग्य अधिकारी कदम यांनी भेट देवून परिस्थिची पाहणी करून संसर्गित महिलेच्या संर्पकात आलेल्या नातेवाईकांना विलगीकरानात ठेवून कॉरंटाईन केले असून, निवघा सर्कल मधिल शिरड येथे दवंडी देवून गावाच्या बाहेरील व्यक्ती कडून कोन्हीही भाजीपाल्या सह इतर वस्तु खरेदी करु नये तसेच विनाकारण घराबाहेर पडू नये शोशल डिस्टन्सिंग पाळावे, मास्क वापरावे अशा सुचना ग्रामपंचायत सह पोलीस पाटील यांनी गावक-यांना दिल्या आहेत.

कोणताही जन संपर्क नसतांना निवघा सर्कल मधिल नागरीकांनी तालुक्यातील उमेदवार सोडून खा.हेमंत पाटील यांना भरभरून मतदान करून भरघोस मतांनी निवडून दिले पण खा. हेमंत पाटील हे निवघा बाजार सर्कल मधिल जनतेला विसरले की काय? असा सवाल येथील नागरिक करतांना दिसत आहेत.

सहा महीण्यापासून खा.हेमंत पाटील हे निवघा सर्कल मध्ये फिरलके सुध्दा नाहीत मोठया आशेने निवघा बाजार सर्कल मधिल शेतकरी खा. हेमंत पाटलाकडे पाहत होता माघिल काही दिवसांमध्ये निवघा सर्कल मध्ये लॉकडावून असतांना येथील शेतक-यांना पेरणीसाठी काही व्यापाº्याकडून बोगस बियाणे देण्यात आले. परिसरातील अनेक शेतकº्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले असून त्यांना कोणतीही नूकसान भरपाई मिळाली नाही व या बोगस बियाणे विक्री करणाº्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही.

निवघा बा. सर्कल मध्ये बहूतांश नागरीकांचा मुख्य व्यवसाय हा शेतीच असून या भागातील शेतक-यांवर आतापर्यत अनेक संकट ओढावले असून आता कोरोणा चे संकट घोंगावत आहे त्यामध्ये परिसरातील शेतक-यांना एकाही नेत्यांनी भेट देवून दिलासा व आरोग्य सोई सुविधा उत्तम रित्या देण्याची ग्वाही आतापर्यंत एकाही नेत्यांनी दिली नाही. दुस-यानेत्यांचे सोडा पण ज्यांना येथील जनतेने लोकसभेत पाठवले ते खा.हेमंत पाटील हे सहा महीण्या पासुन निवघा बाजार सर्कलमध्ये फिरकले नाहीत आता तरी खा.हेमंत पाटील हे निवघा बा.सर्कलला भेट देवून येथील आरोग्य यंत्रेनेचा आढावा घेवून येथील नागरीकांना कोरोणा संकटाच्या काळात योग्य सोयीसुविधा उपलब्द करुन देण्याची काळजी घेतील का? असा प्रश्न परिसरातील जनता विचारतांना दिसत आहे.

Read More  किसान क्रेडीट कार्ड योजनेची शिवामृत दूध संघाकडून प्रभावीपणे अंमलबजावणी : धैर्यशील मोहिते पाटील

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या