लोहा : लोहा शहराच्या मध्यवर्ती असलेल्या लोहा बसस्थानकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाच ते दहा फुटांचे खड्डे पडले असून त्यामुळे प्रवाशांना आणी बस चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्याकडे मात्र वरीष्ठाचे जाणीव पूर्वक दुर्लक्ष होत आहे.लोहा शहराच्या मध्यवर्ती भागात हे बसस्थानक आहे मोठ्या प्रमाणात प्रवासी संख्या आहे तर काही ठिकाणी खुर्चीची मोडतोड झाली आहे त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
अनेक वेळा प्रशासनाला सूचना देऊन देखील त्या दुरुस्त केल्या जात नसल्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे याकडे मात्र वरिष्ठांची जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्यामुळे प्रवासी त्रास सहन करावा लागत आहे शहराच्या मध्यवर्ती असल्यामुळे मोठ्या प्रमाणात बसस्थानकामध्ये गर्दी असते ग्रामीण भागातील नागरिक, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात बस स्थानकावर येना जाणाऱ्यांची आहे.
असते सध्या पाऊसाळ्याचे दिवस असल्यामुळे शहराच्या मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक पाऊस लागू नये म्हणून बसस्थानकात येत असतात पण बसस्थानकात येत असताना मोठ मोठे खड्डे आणी त्यामध्ये मोठ्या प्रमाणात साचलेले पाणी चे डबके त्यामुळे प्रवाशांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
तसेच खुर्च्या मोडून गेले आहेत तर काहींचे खिळे,स्क्रू वर आले आहेत तर त्यामुळे त्यांवर बस्ता येत नाही तर त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे .तर काही मोडून पडल्या आहेत .याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे याकडे वरिष्ठ नीत्वरित लक्ष देऊन बसस्थानकातील खड्डे दुरुस्त करावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी भिमसेना चे विधानसभा अध्यक्ष विलास सावळे यांनी दिला आहे.