कंधार : मागील पाच ते सहा दिवसापासून राज्यासह तालुक्यात परिसरात पावसाने हाहाकार माजवला असून लहान अवस्थेत असलेले सोयाबीन हे पीक उस्माननगर, बारूळ, दिग्रस बु. या मंडळातील आधीच सततच्या पावसामुळे पिवळे पडले होते.
त्यामध्ये मागील पाच दिवसापासून मुसळधार पावसामुळे सोयाबीन कापूस यासह कडधान्य पिके ही पूर्ण पाण्यात गेली आहेत. तालुक्यातील नदी नाले ओसंडून जात आहेत त्यामुळे परिसरातील कमकुवत असलेले रस्ते पूल पावसात वाहून गेल्याचेही चित्र दिसत आहे. आतापर्यंत तालुक्यात एकुण 547 मिमी पाउस झाला आहे.
गत पाच दिवसांतील संततधार पावसाने पिके पाण्याखाली गेल्याने आता आर्थिक ओझ्याखाली दबावे लागणार, अशा प्रतिक्रिया शेतक-यांमधून उमटत आहेत .तसेच पानशेवडी ल.पा., घागरदरा, भेंडीवाडी सा.त. पेठवडज या मध्यम प्रकल्पातील पाणी पातळी शंभर टक्क्यांवर आली आहे. तालुक्यात आज कंधार शहरात 106.8 मी.मी, कुरूळा 83.3 मी.मी, फुलवळ 95.8 मी. मी, पेठवडज 95.8 मी मी.उस्माननगर 111.5 मी मी, बारूळ 95.8 मी मी तर दिग्रस बु. मंडळात 101.5 मी मी पाऊस पडला आहे तालुक्यातील आजचे सरासरी पर्जन्य 98.6 मी मी पाऊस पडला आहे.