28.3 C
Latur
Friday, June 25, 2021
Homeनांदेडगरज पडल्यास लहान मुलांच्या आरोग्यासाठी ५00 खाटांचे नियोजन

गरज पडल्यास लहान मुलांच्या आरोग्यासाठी ५00 खाटांचे नियोजन

एकमत ऑनलाईन

नांदेड : जिल्ह्यात कोविड बाधितांचे वाढलेले प्रमाण ब-याच अंशी कमी होत असल्याचे निदर्शनास येत आहे. या लाटेत तरुण व युवावर्ग मोठ्या प्रमाणात बाधित झाला. भविष्यात जर तिस-या लाटेचा धोका उद्भवलाच तर जिल्हा प्रशासनातर्फे वयोवृद्धांसह आता प्रामुख्यांने लहान मुलांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करुन नियोजन केले जात आहे. या तिस-या लाटेत लहान मुलांना जपणे आवश्यक असून कोरोनाबाबतची काळजी व सुरक्षित वर्तण मुलांकडूनही होणे अत्यावश्यक असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. याबाबत अधिक काळजीचे कारण जरी नसले तरी भविष्यात वेळेवर धावपळ होण्यापेक्षा आतापासूनच लहान मुलांसाठी कोविड व्यवस्थापन विशेष वार्ड व खाटांचे नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या.

त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली आज विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्ह्यात लहान मुलांसाठी सद्यस्थितीत विविध रुग्णालयात 500 खाटांचे विशेष नियोजन करुन याबाबत पूर्वतयारी करण्यात आली. या बैठकीस शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. दिलीप म्हैसेकर, बालरुग्ण विभाग प्रमुख डॉ. सलिम तांबे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सिरसीकर, बालरोग तज्ज्ञ असोसिएशनचे सचिव डॉ. राजेश नुने, डॉ. संदिप पाटील, डॉ. श्रीरामे यांची उपस्थिती होती.

नांदेड जिल्ह्याची एकुण लोकसंख्या सन २०११ च्या जनगणनेनुसार ३३लाख ६१हजार एवढी आहे. यात शुन्य ते ६वयोगटातील लोकसंख्या ही जिल्ह्याच्या एकुण लोकसंख्येच्या १३.६७टक्के एवढी आहे. शुन्य ते १७ या वयोगटातील संख्या विचारात घेता हे प्रमाण २० टक्क्यांच्या जवळपास येते. या वयोगटातील मुलांच्या आरोग्यासाठी विशेष काळजी व तसे नियोजन करणे क्रमप्राप्त ठरले आहे. त्यादृष्टिने आजच्या बैठकीत डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय, गुरुगोबिंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, शासकीय आयुर्वेदिक रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी मुलांसाठी उपचारांच्या सेवा-सुविधा बाबत चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी यासाठी स्वतंत्र बालरोग तज्ज्ञांचा स्वतंत्र टास्क फोर्स निर्माण करुन व्हेंटिलेटर व इतर उपकरणांच्या सुसज्जतेसाठी कृति आराखडा तयार केला आहे. पुढील एक महिन्यांमध्ये याचे नियोजन करण्याचे प्रस्तावित आहे. मुलांसाठी लागणारी औषधी, त्यांचे वयोगट लक्षात घेता उपचारा समवेत शाररिक व माणसिक तंदुरुस्तीसाठी उपाय योजना, लक्षण विरहित कोविड जर मुलांमध्ये आढळला तर त्यादृष्टिने नियोजन याचाही साकल्याने या बैठकीत विचार करण्यात आला.

सिंगापूरचे ऑक्सिजन कॉन्स्ट्रेंटर तातडीने रूग्णसेवेत वापरण्याचे निर्देश
राज्य शासनाने येथील जिल्हा रूग्णालयाला सिंगापूरचे १० ऑक्सिजन कॉन्स्ट्रेंटर उपलब्ध करून दिले आहेत. हे कॉन्स्ट्रेंटर तातडीने रूग्णसेवेसाठी वापरण्यात यावे, असे निर्देश पालकमंत्री ना. अशोकराव चव्हाण यांनी प्रशासनाला दिले आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुभार्वामुळे देशभरात ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ऑक्सिजनचे उत्पादन आणि साठवणुकीची क्षमता वाढवली जाते आहे. दरम्यान, या आणिबाणीच्या परिस्थितीत अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांनी मदतीचा हात पुढे केला असून, सिंगापूरच्या टेमासेक फाऊंडेशन या संस्थेने राज्य शासनाला ऑक्सिजन कॉन्स्ट्रेंटर उपलब्ध करून दिले आहेत. त्यापैकी १० कॉन्स्ट्रेंटर नांदेडच्या जिल्हा रूग्णालयाला सुपूर्द करण्यात आले आहेत. या सहकायार्साठी पालकमंत्री ना. अशोकराव चव्हाण यांनी सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे आभार मानले आहेत.

नांदेड जिल्हयातील कोरोनाबाधितांवर तातडीने योग्य उपचार सुरु व्हावेत, त्यांची बेड, ऑक्सिजनसाठी धावपळ होऊ नये, यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अशोकराव चव्हाण यांनी पुढाकार घेऊन नांदेड येथे तत्परतेने जंबो कोविड केअर सेंटर उभारले. त्याशिवाय एसडीआरएफमधून जिल्ह्याला ५२ नव्या रुग्णवाहिका मिळवून दिल्या. त्यानंतर आता नांदेड जिल्ह्याला नवे दहा ऑक्सिजन कॉन्स्ट्रेंटर उपलब्ध झाल्याने रूग्णांसाठीच्या सुविधांमध्ये वाढ झाली आहे.

पुण्यात जात असलेला कर्नाटक गुटखा सांगोला पोलिसांनी पकडला

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या