21.1 C
Latur
Tuesday, September 28, 2021
Homeनांदेडशालेय पोषण आहारात प्लास्टीकचे तांदुळ

शालेय पोषण आहारात प्लास्टीकचे तांदुळ

एकमत ऑनलाईन

ईस्लापुर : कोसमेट येथील जिल्हा परिषद केंद्र्रिय प्राथमीक शाळेत शालेय पोषण आहाराच्या धान्यांत चक्क प्लास्टीकचे तांदुळ वाटप करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.यामुळे गावात खळबळ उडाली असून निकृष्ट तांदुळाचा पुरवठा करणा-या पुरवठाधारकावर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकुर यांच्याकडे करण्यात आली आहे.

शासनाकडून शाळेतील लहान मुलांना शालेय पोषण आहारा पोटी तांदुळ,गहू व अन्य पौष्टिक धान्या देण्याचे नियोजन आहे.मात्र यास धान्याचा काळाबाजार करणा-यांकडून हारताळ फासला जात असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. कोसमेट येथील केंद्रिय जिल्हा परिषद प्राथमीक शाळा असून या शाळेत पोषण आहाराचे धान्य हे महाराष्ट्र स्टेट को- आँपरेटिव्ह कंज्युमर्स फेडरेशन लि.मुंबई यांच्या मार्फत पुरविण्यात येत आहे.या धान्यात प्लास्टिकचे तांदुळ असल्याचा संशय गावचे सामाजीक कार्यकर्ते अनिल शिरफुले यांना येताच त्यांनी याबाबत दि .२६ जुलै रोजी शाळेच्या मुख्याध्यापकाला पत्र दिले.

यानूसार दि.२७ जुलै रोजी किनवट पंचायत समितीच्या सुचनेनुसार गावचे उपसरपंच नागोराव बंकलवाड,शाळा समितीचे अध्यक्ष दतात्रय वाघमारे,अनिल शिरफुले,मारोती शेळके यांच्या समक्ष पंचनामा या तांदळाचा करण्यात आला आहे. या तांदळाचे २५० ग्रँम नमुने पंचायत समिती किनवटला पाठवण्यात आले आहेत.तपासणीत हे निकृष्ट तांदुळ आहेत की खरेच प्लास्टिकचे आहेत हे उघड होणार आहे.

हा प्रकार अतिशय धक्कादायक असून विद्यार्थाच्या जीवाशी खेळणा-या पुरवठादाराविरुध्द कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गावचे माजी सरपंच शिवाजी बोट्टेवाड,रमेश बोड्डेवार यांच्यासह ईस्लापुर गटाचे जि.प.सदस्य तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य सुर्यकांत आरंडकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकुर यांच्याकडे केली आहे.

चिखलमय रस्त्याने घेतला युवकाचा बळी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या