21.1 C
Latur
Tuesday, September 28, 2021
Homeनांदेडलिंबगावात प्लास्टिकचे तांदूळ आढळले

लिंबगावात प्लास्टिकचे तांदूळ आढळले

एकमत ऑनलाईन

नांदेड : शाळे मार्फत दिल्या जाणा-या शालेय पोषण आहारात चक्क प्लास्टिकच्या तांदळाची भेसळ होत असल्याचे उघड झाले आहे.प्रारंभी ईस्लापूर,हिमायतनगर आणि नांदेडातील लिंबगाव येथेही विद्यार्थ्यांच्या धान्यात प्लास्टिकचे तांदूळ आढळून आले आहेत.लहान विद्यार्थ्यांच्या जीवीताशी खेळण्याच्या या प्रकारामुळे नांदेड जिल्हयात खळबळ उडाली आहे.मात्र याकडे जिल्हा परिषद प्रशानसाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे.

सर्वच शाळेत शिकणा-या लहान विद्यार्थ्यांना शासनाकडून धान्य पुरवठादारांमार्फत पोषण आहार म्हणून तांदुळ,हरबरा,मुग आदी दिल्या जाते. सध्या कोरोना संसगार्मुळे शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्याना शिक्षणाचे ऑनलाईन धडे दिले जात आहेत. या सोबतच विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचे वाटप सुरू आहे. कोरोना काळाच्या अगोदर शाळेतच भात शिजवून विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येत होता. आता शालेय पोषण आहार घरपोच देण्याचे काम चालू आहे.मात्र विद्यार्थ्यांंना दिल्या जाणा-या तांदळात चक्क प्लास्टिकचे तांदुळ आढळून येत आहेत.हा धक्कादायक प्रकार सर्व प्रथम ईस्लापूर भागातील एका जिल्हा परिषद शाळेतून दिलेल्या तांदळातून उघड झाला.याबाबत गावक-यांनी सीईआेंकडे तक्रार केली.याची चौकशी पुर्ण होण्या आधीच पुन्हा हिमायतनगरातील टेंभी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेल्या शालेय पोषण आहाराच्या तांदळात प्लास्टिक मिश्रित तांदुळ आढळून आले आहेत. ही बाब गुरुवारी सकाळी उघडकीस आली.तेव्हा विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेत जाऊन तांदळाची पाहणी केली आहे.

सदर तांदुळाचे वाटप करू नये आणि पाल्यांच्या जीवनाशी चाललेला खेळ थांबवावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.यानंतर केवळ दोनच दिवसाच्या अंतराने नांदेड तालुक्यातील लिंबगाव येथील जिल्हा परिषद हायस्कूलमधील शालेय पोषण आहारामध्ये प्लास्टिकचे तांदुळ आढळून आले. संशय आल्याने येथील पालक विश्वनाथ धुमाळ यांनी मुलांला दिलेले काही तांदुळ तोंडामध्ये चावून पाहिले तेव्हा हे प्लास्टिक तांदुळ असल्याची खात्री झाली. त्यावेळी त्यांनी ग्रामपंचायत लिंबगाव याठिकाणी ते तांदूळ आणून दाखवले.सदर हे तांदुळ पाण्यात टाकताच तरंगत होते.यामुळे सर्वानाच धक्का बसला. जिल्हातील ईस्लापूर,हिमायतनगर पाठोपाठ नांदेडातील लिंबगाव येथेही प्लास्टिक मिश्रित तांदुळ आढळून आले आहेत.

विद्यार्थ्यांच्या जीवाशी अशाप्रकारे खेळले जात असतांना भेसळखोरांवर तातडीने कारवाई करण्या ऐवजी जिल्हा परिषद प्रशासनाकडून केवळ चौकशी सुरू असल्याचे सांगुन याकडे दुर्लक्ष केले जात आहे.असा आरोप पालकांमधून होत आहे. दरम्यान शालेय पोषण आहारामध्ये भेसळ करणा-यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जि.प.सदस्य साहेबराव धनगे यांनी केली आहे.

माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या