36.5 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeनांदेडकत्तलीसाठी जाणारी जनावरे पोलिसांनी पकडली

कत्तलीसाठी जाणारी जनावरे पोलिसांनी पकडली

एकमत ऑनलाईन

अर्धापूर : अधार्पूरकडून वसमतकडे जाणा-्या ट्रक मधून वाहतूक होत असलेली गोवंश जनावरे मंगळवारी पहाटे अधार्पूर पोलीसांनी पकडून जप्त केली. तसेच अवैध वाहतूकीसाठी वापरण्यात येणारा मालवाहू ट्रक जप्त करून पाच जणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धाडसी कार्यवाही बद्दल अधार्पूर पोलीसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

याबाबत पोलीस सुत्राकडून मिळालेली माहिती अशी की, अधार्पूर – वसमतफाटा महामार्गावरील सांगवी खडकी पाटी जवळ माल वाहतूक करणारे ट्रक क्रमांक एम. एच. – ३१ सी. क्यु. – ७१७५ व एम. एच. – ४० ए. के. – ७६७४ याची तपासणी केली असता या दोन ट्रकमध्ये गोवंश जातीचे ३५ जनावरे कत्तल करण्यासाठी जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी या जनावरासह दोन ट्रक ताब्यात घेण्यात आली. या गोवंशाची किंमत सुमारे ७ लाख तर दोन ट्रकची किंमत २५ लाख असा एकूण ३२ लाखाचा माल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी जमादार सतीश लहानकर यांनी दिलेल्या फियार्दीवरून राजीक हुसैन पिता कासमी हुसैन (बुरशीपुरा ता. कळंब), सादिर अहमद कुरेशी समैद कुरेशी ( रा. कळंब) जुलफीकार अहमद कुरेशी ( रा. कळं) महंमद इस्सक महंमद हानीफ ( रा. कळंब), अब्दुल सादिक अब्दुल सत्तार (रा. कळंब ) यांच्या विरुद्ध अधार्पूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक साईनाथ सुरवसे हे करित आहेत.

अर्धापूर तालुक्यातून अवैध गौवंशाची वाहतूक हा नेहमीचाच प्रकार असून या पुवीर्ही अनेक वेळा अशाच प्रकारे अवैध गौवंशाची वाहतूक करणारे वाहने जप्त करून गौवंशाची मुक्तता करण्यात आली होती. आज अगदी सकाळच्या प्रहरी अवैधरित्या गोवंश वाहतूक करून कत्तलीसाठी जात असलेल्या बत्तीस जनावरांना पकडून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अधार्पूर पोलिसांच्या या धाडसी कार्यवाहीमूळे जनावरांचे मात्र प्राण वाचले असून या कार्यवाहीबद्दल पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

नियमन की वेसण?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
167FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या