24.8 C
Latur
Saturday, November 27, 2021
Homeनांदेडचोरी झाल्याची तक्रार देण्यास गेलेल्या फिर्यादीवर पोलिसांची दबंगगिरी

चोरी झाल्याची तक्रार देण्यास गेलेल्या फिर्यादीवर पोलिसांची दबंगगिरी

एकमत ऑनलाईन

निवघाबाजार : येथून जवळच असलेल्या मौजे शिरड ता. हदगांव येथील रहिवासी संतोष शिवाजी काळे हे दि.४रोजी काही कामासाठी पुसद येथे जाण्यासाठी आपल्या पत्नीसह शिरडहून निघाले व हदगांव बसस्थानकामध्ये थांबुन पुसद येथे जाण्यासाठी पुसद एसटी ची वाट बघत बसले होते.एसटी.बस येताच गाडी मध्ये चढण्यासाठी बसच्या दरवाज्याजवळ गेले संतोष काळे व त्यांची पत्नी सौ.मनिषा काळे वर चढत असतांना अचानक काही महिलांनी एसटीच्या दरवाजावर गर्दी केली.एस टी मध्ये चढत असतांना एका महिलेने गदीर्चा फायदा घेत सौ.मनिषा काळे यांच्या पर्सची चईन उघडून त्यामध्ये असलेले छोटे पाकीट काढून घेतले ही चोरी होत असलेली बाब सौ.मनिषा काळे यांच्या लक्षात येताच त्यांनी आपले पती संतोष काळे यांना सांगीतले एस टी मधून खाली उतरेपर्यंत चोरी करणा-या महिलेने बसस्थानकामधून पळ काढला त्या महिलेच्या मागे जायीपर्यंत ती दिशेनाशी झाली तसे हदगांव बसस्थानकामधील सि.सि.टि.व्ही फुटेच मध्ये महिला पळतांना दिसत आहे.

बसस्थानकामधील फुटेच सबंधित चोरी झालेल्या फियार्दी सौ.मनिषा काळे यांच्या पतिने घेवून पोलिसांना दाखवले सुध्दा आहेत. सौ.मनिषा संतोष काळे या महीलेच्या पर्स मध्ये असलेले १२ ग्रॅम सोन्याचे गंठण,रोख २५०० रूपयांसह आधारकार्ड, मतदान कार्ड या महिलेने चोरून नेले आहे. सदरील चोरीची घटना दि.४ रोजी हदगांव बसस्थानकामध्ये दुपारी ४ वा घडली अत्यआवशक काम असल्याने संतोष काळे व त्यांची पत्नी त्याच दिवशी पुसद येथे गेले तिथून दि.८ रोजी परतत असतांना हदगांव येथे पोलीस ठाण्यात चोरी झाल्याची तक्रार देण्यासाठी गेले असता हदगांव पोलीसांनी त्यांना एक तास पोलीस ठाण्यात त्यांची फिर्याद न घेताच त्यांना बसवुन ठेवले.

सौ.मनिषा काळे यांनी चोरी झाली असून आज्ञात महीले विरुध्द गुन्हा नोंद करुन चोरी झालेल्या मुद्देमालाचा तपास करावा अशी फिर्याद देण्याचा अर्ज केला असता हदगांव ठाण्यातील कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचा-्यांनी सबंधीत चोरी झालेल्या सौ.मनिषा संतोष काळे यांच्या पतीवर दबाव टाकून तुमची चोरी झालीच नाही. त्यामुळे तुम्ही आम्ही सांगतो तशी फिर्याद दया आमचे दागीने व रक्कम हा मुद्देमाल गहाळ झाला आहे अशी फिर्याद दया म्हणून आमच्यावर दबाव टाकून पोलीसांच्या म्हणण्यानुसार फिर्याद देण्यास भाग पाडल्याचे संतोष काळे यांनी दै. एकमत प्रतिनिधीशी बोलतांना सांगीतले.

मी व माझी पत्नी हदगांव बसस्थानकात आमची चोरी झाल्यावर चोरी गेलेल्या मुद्देमाल व कागदपत्रे प्रकरणी रितसर अर्ज हदगांव पोलीस ठाण्यात देण्यासाठी गेलो होतो. कर्तव्यावरील पोलीस कर्मचा-्यांने आम्ही दिलेला चोरीचा अर्ज वाचला आणि अशी फिर्याद देता येणार नाही असे सुनावले व आम्ही दिलेल्या अर्जावर खाडा तोड करून त्यांना पाहीजे तसे लिहीले व सबंधीत मुद्देमाल चोरी न होता गहाळ झाल्याचे लिहून घेवून आम्ही तपास करतो म्हनुन पोलीस ठाण्यातून हकलून दिले.आम्हाला तर आता पोलीसांचा या चोरीला पाठींबाच आहे असे वाटते पोलीसच असे वागत असतील तर आम्ही फिर्याद कोठे करावी कायदा व सुव्यवस्था काहीही राहीले नाही – संतोष शिवाजी काळे रा. शिरड यावर लक्ष देवून होणा-या चो-यांना लगाम घालून सामन्य नागरीकांचा कायदा व सुव्यवस्था वरिल विश्वास कायम ठेवावा अशी रास्त मागणी येथील सामान्य नागरीकांमधून होत आहे.

मायक्रोफायनान्स कंपन्यानी दबाव टाकून कर्ज वसुली करू नये -जिल्हाधिकारी जी. श्रीकांत

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या